एक्स्प्लोर
प्रियांकाला अर्ध्या तासासाठी 12 कोटी, दीपिकाला पूर्ण सिनेमासाठी 8 कोटी!
मात्र प्रियांका सध्या आणखी एका बातमीमुळे चर्चेत आहे. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यातील अर्ध्या तासाच्या एका परफॉर्मन्ससाठी तिला 12 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती.
मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या तिच्या अमेरिकन टीव्ही शो 'क्वॉन्टिकोच्या सीझन 3' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती लवकरच अ किड लाईक जेक आणि इझन्ट इच रोमँटिक या हॉलिवूडपटात दिसणार आहे. तर भारतीय चाहत्यांना तिला लवकर एखाद्या बॉलिवूड सिनेमात पाहण्याची उत्सुकता आहे.
मात्र प्रियांका सध्या आणखी एका बातमीमुळे चर्चेत आहे. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यातील अर्ध्या तासाच्या एका परफॉर्मन्ससाठी तिला 12 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती.
परंतु 12 कोटींच्या ऑफरवर समाधानी नसल्याने प्रियांकाने ती नाकारली. प्रियांकाच्या मते, "ती आता आंतरराष्ट्रीय स्टार आहे, त्यानुसार तिला पैसे मिळायला हवेत. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांप्रमाणे तिला पैशांची ऑफर मिळावी, अशी अपेक्षा आहे."
दुसरीकडे सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये दीपिका पादूकोणचा समावेश होतो. परंतु दीपिकाला एका सिनेमासाठी आठ कोटी रुपये मिळतात. दीपिकाच काय बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींनाही एखाद्या संपूर्ण सिनेमासाठी 12 कोटी रुपये मिळत नाही, मात्र प्रियांकाला केवळ 30 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी 12 कोटींची ऑफर देण्यात आली होती.
तरीही तिने ही ऑफर नाकारली, कारण तिला सलमान खान आणि शाहरुख खानएवढीच रक्कम हवी होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement