एक्स्प्लोर
प्रियांका चोप्रा बनवणार माधुरीच्या जीवनावर विनोदी मालिका
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं आता हॉलिवूडमध्ये आपला चांगलाच जम बसवला असून, आता ती निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करत आहे. अमेरिकेच्या 'एबीसी' नेटवर्कसाठी ती एक विनोदी मालिका तयार करणार असून, ही मालिका बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितच्या जीवनावर आधारित आहे.

लॉस एंजेल्स : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं आता हॉलिवूडमध्ये आपला चांगलाच जम बसवला असून, आता ती निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करत आहे. अमेरिकेच्या 'एबीसी' नेटवर्कसाठी ती एक विनोदी मालिका तयार करणार असून, ही मालिका बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितच्या जीवनावर आधारित आहे. 'वेरायटी डॉट कॉम'ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत तिनं याबाबत खुलासा केला आहे. या मालिकेच्या नावावर सध्या विचार सुरु असून, ही मालिका माधुरी दीक्षितच्या जीवनावर आधारित असल्याचं, सांगितलं. या मालिकेद्वारे माधुरीने अमेरिकेत स्थाईक झाल्यानंतर, कशाप्रकारे आपल्या दोन संस्कृतींची जोपासना केली, हे दाखवण्यात येणार आहे. त्याशिवाय तिनं याकाळात आपल्या चमकदार जीवनशैलीत बदल करुन, शांत आणि समाधानी जीवन जगत असल्याचं दाखवण्यात येणार असल्याचंही तिनं यावेळी सांगितलं. वास्तविक, माधुरीच्या लग्नानंतर तिने काही काळासाठी मोठ्या पडद्यापासून लांब राहणेच पसंत केलं. लग्नानंतर ती अमेरिकेत स्थाईक झाली. पण पाच वर्षांपूर्वीच आपल्या दोन्ही मुलांसह माधुरी पुन्हा मायदेशी परतली. दरम्यान, माधुरीच्या या नव्या कॉमेडी शोबद्दल तिने महिन्याभरापूर्वीच माहिती दिली होती. तिनं सांगितलं होतं की, काहीतरी रोमांचक होणार आहे. ज्याची घोषणा लवकरच केली जाईल. प्रियांका सध्या अमेरिकेच्या 'क्वांटिको' शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या शोचं तिसरं पर्व सुरु आहे. याशिवाय ती लियम हेम्सवर्थसोबत एका रोमँटिक कॉमेडी 'इजंट् इट रोमँटिक' या शोचं शूटिंग करत आहे. प्रियांकाने 'बेवॉच' या सिनेमानं हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















