एक्स्प्लोर
10 वर्ष लहान बॉयफ्रेण्डच्या हातात हात घालून प्रियांका लंडनला रवाना
प्रियांका आणि निक जोनस यांच्यातील प्रेमसंबंधांच्या चर्चा जगभरात सुरु आहेत. या दोघांनीही मुंबईत मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या श्लोका मेहता यांच्या साखरपुड्याला हजेरी लावली.
मुंबई: हॉलिवूडमध्ये छाप पाडणारी बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा तिचा बॉयफ्रेण्ड अमेरिकन गायक-अभिनेता निक जोनससह लंडनला रवाना झाली. या दोघांनीही मुंबईत मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या श्लोका मेहता यांच्या साखरपुड्याला हजेरी लावली.
या कार्यक्रमानंतर काल रात्री दोघेही लंडनला रवाना झाले. दोघेही हातात हात घालून विमानतळाकडे जाताना दिसले. लंडनमध्ये निकची कॉन्सर्ट असल्यामुळे त्याला तातडीने निघायचं होतं. मात्र त्याच्यासोबत प्रियांकानेही जाणं पसंत केलं.
पुढच्या महिन्यात साखरपुडा?
प्रियांका आणि निक जोनस यांच्यातील प्रेमसंबंधांच्या चर्चा जगभरात सुरु आहेत. हे जोडपं पुढच्या महिन्यात एंगेजमेंट करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 25 वर्षांचा निक जोनस अमेरिकन गायक, गीतकार आणि अभिनेता आहे. वयाच्या सातव्या वर्षी त्याने नाटकात काम करायला सुरुवात केली. प्रियंका निकपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे.
'फिल्मफेअर' मासिकाच्या रिपोर्टनुसार जुलैअखेर किंवा ऑगस्ट महिन्यात प्रियंका आणि निक साखरपुडा करण्याची शक्यता आहे. आपल्या कुटुंबीयांना भेटवण्यासाठीच प्रियंका निकला सोबत घेऊन भारतात आल्याचा अंदाज आहे.
प्रियंकाने भूमिका केलेल्या 'काँटिको' मालिकेतील तिचा सहकलाकार ग्रॅहम रॉजर्सने दोघांची ओळख करुन दिली होती.
VIDEO:
संबंधित बातम्या
प्रियंका चोप्रा-निक जोनस यांचा जुलैमध्ये साखरपुडा?
प्रियांका 100 कोटींच्या घरात बॉयफ्रेंडला पार्टी देणार
प्रियांकाचा को-स्टारला पॅशनेट किस, फोटो व्हायरल
पुरुष कलाकारांनाही ‘कास्टिंग काऊच’चा सामना करावा लागतो : प्रियंका चोप्रा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
Advertisement