Priyanka Chopra : बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आज आपला 41 वा वाढदिवस (Priyanka Chopra Birthday) साजरा करत आहे. गेल्या 23 वर्षांपासून 'देसी गर्ल' चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. वयाच्या 18 व्या वर्षी 'मिस इंडिया' आणि 'मिस वर्ल्ड'चा किताब पटकावणाऱ्या प्रियंका चोप्राचा जन्म 1982 मध्ये जमशेदपूरमध्ये झाला. प्रियंकाला लहानपणी मानसोपचारतज्ज्ञ होण्याची इच्छा होती.  


वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी मिस इंडियाचा किताब आपल्या नावे करत प्रियंका रातोरात सुपरस्टार झाली. मेहनतीच्या जोरावर अभिनेत्रीने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. आजवर तिने 80 पेक्षा अधिक सिनेमे आणि सीरिजमध्ये काम केलं आहे. 2000 मध्ये मिस इंडियाचा किताब पटकावल्यानंतर तिने 'साजन मेर सतरंगिया' या लघुपटाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर 'थमिजाह' हा सिनेमा तिने केला. 2003 मध्ये आलेल्या 'द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाई' या सिनेमात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. पण 'अंदाज' या सिनेमाच्या माध्यमातून ती खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाली. 




बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी प्रियंका!


'अंदाज' सिनेमाच्या यशानंतर प्रियंका चोप्राने कधीच मागे वळून पाहिलं नाही. प्लॅन, किस्मत, असंभव सारख्या सिनेमांत तिने काम केलं. 2005 मध्ये आलेला 'मुझसे शादी करोगी' या सिनेमातील प्रियंकाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तिचा हा सिनेमा सुपरहिट ठरला. 2016 साली प्रियंकाने हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.  
प्रियंका चोप्रा हॉलिवूडमध्ये मुख्य भूमिका करणारी पहिली बॉलिवूड नायिका ठरली. 


प्रियंका चोप्रा 2018 मध्ये निक जोनाससोबत लग्नबंधनात अडकली. सध्या ती पतीसोबत आणि लेक मालतीसोबत अमेरिकेत आहे. हॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतरही प्रियंका बॉलिवूड गाजवत आहे. 2021 मध्ये आलेल्या 'व्हाइट टायगर' सिनेमातील प्रियंकाच्या दमदार अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 


कोट्यवधींची मालकीण प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra Net Worth)


प्रियंका चोप्राची एकूण संपत्ती 620 कोटींच्या आसपास आहे. एका सिनेमासाठी ती 12 कोटी रुपये आकारते. तर एका इंस्टा पोस्टसाठी अभिनेत्री तीन कोटी रुपये घेते. प्रियंकाचं एक मुंबईत आलिशान घर आहे. या घराची किंमत सात कोटी रुपये आहे. लॉस एंजलिसमधील तिच्या घराची किंमत 238 कोटी रुपयांच्या आसपास आहे. तसेच तिच्याकडे अनेक महागड्या गाड्यादेखील आहेत. 


संबंधित बातम्या


Shahrukh Khan : अफेअरच्या अफवानंतर शाहरूखने प्रियंकाला सांगितलं, 'माझ्याशी लग्न कर...', प्रियंका चोप्राला बसला धक्का