Priyanka Chopra and Nick Jonas Welcome Baby Girl : प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)आणि निक जोनास (Nick Jonas) यांनी काल रात्री आई-वडील झाल्याची बातमी शेअर करत सर्वांना आश्चर्यचकित केले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रियांका चोप्रा बेबी प्लॅनिंगचा विचार करत असल्याच्या बातम्यादेखील सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत होत्या. प्रियांका चोप्राच्या याच पोस्टने तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पण, आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे की, नेमका छोटा राजकुमार झाला की, छोटी राजकुमारी झाली आहे. या बातमीत आम्ही तुमचा हाच संभ्रम दूर करणार आहोत.
मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या घरी छोट्या राजकुमारीचे आगमन झाले आहे. प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी काल रात्री पोस्ट करून सांगितले की, आम्ही सरोगसीद्वारे पालक बनलो आहोत, हे कळवताना खूप आनंद होत आहे. प्रियांकाने गूड न्यूज शेअर करत पुढे लिहिले की, 'आम्ही आदरपूर्वक या खास प्रसंगी चाहत्यांना गोपनीयता बाळगण्याचे आवाहन करतो. कारण आम्हाला आमचे लक्ष कुटुंबावर केंद्रित करायचे आहे. आभार!' ही बातमी येताच सोशल मीडियावर या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली. प्रियांकाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांपासून अनेक सेलिब्रिटी कमेंट करत आहेत. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2018 साली लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघांनीही लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. अलीकडेच प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पती निक जोनासचे आडनाव काढून टाकले होते, त्यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. मात्र, नंतर ती केवळ अफवा असल्याचे समोर आले.
महत्वाच्या बातम्या :
- RRR Release Date : बहुप्रतिक्षित RRR चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, निर्मात्यांनी केला खुलासा
- Pigmentation Remedies : कच्च्या दुधाचा असा करा वापर सुरकुत्या होतील दूर आणि त्वचा होईल मुलायम
- IPL 2022 : दहा संघानं कोणते खेळाडू केले खरेदी; कुणाकडे राहिली किती रक्कम? वाचा सविस्तर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha