मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास कधी आपल्या ड्रेसमुळे तर कधी आपल्या व्हिडीओमुळे चर्चेत असते. यावेळी प्रियांका चोप्रा एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये प्रियांकासोबत निक जोनासही दिसत आहे. हा व्हिडीओ व्हेलेंटाइन डेचा असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


प्रियांका चोप्रा आणि निक जोनास नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. प्रियांका आणि निकने आपल्या व्हेलेंटाइन डे साजरा केला. त्यादरम्यानचा हा व्हिडीओ त्यांनी फॅन्ससोबत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही मस्ती करताना दिसत आहेत.


अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास आणि पॉप सिंगर पती निक जोनस अनेकदा कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. निकने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने प्रियांकाला टॅगही केलं आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. शनिवारी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये निक आणि प्रियांकाला बॉलिवूडचं गाणं 'आंख मारे'वर डान्स करताना दिसले.





इटलीमधील मिलान येथे शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये निक जोनासने लिहिलं आहे की, 'माझ्या आयुष्यभराच्या व्हेलेंटाइनसोबत शोआधी केलेली डान्स पार्टी.' निकने आपल्या पोस्टमध्ये प्रियांकाला टॅगही केलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाखांपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आला आहे.





मिलानमध्ये पॉप सिंगर निक जोनासचा म्युझिक कॉन्सर्टचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत प्रियांका चोप्राने लिहिलं की, 'आयुष्यभरासाठी माझा व्हेलेंटाइन. या लेदर पॅन्टमध्ये तो जीआय जो प्रमाणे दिसत आहे.' निक आणि प्रियांकाच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. तसेच या दोघांना व्हेलेंटाइन्सच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.


संबंधित बातम्या : 


Grammy अवॉर्ड्सच्या डीप नेक आउटफिटमुळे प्रियांका झाली ट्रोल


First Look : 'लाल सिंह चड्ढा'मध्ये असा असेल करीना कपूरचा लूक; नवं पोस्टर रिलीज


Oscars 2020 : यंदा पॅरासाईट चित्रपटाचाच डंका तर वॉकिन फिनिक्सला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बहुमान


Baaghi 3 Trailer : टायगर श्रॉफच्या जबरदस्त अॅक्शनसह 'बागी 3' चा ट्रेलर रिलीज