Salaar Poster Out: साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनचा (Prithviraj Sukumaran) काल 40 वा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त ‘सालार’ (Salaar) या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या मेकर्सनं प्रेक्षकांना एक खास गिफ्ट दिलं. सालार चित्रपटातील पृथ्वीराज सुकुमारनचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. त्याच्या या लूकची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. 

Continues below advertisement


पृथ्वीराज सुकुमारनच्या वाढदिवसानिमित्त पृथ्वीराज चित्रपटाच्या निर्मात्यांनी पृथ्वीराजच्या लूकचे पोस्टर रिलीज केले. या पोस्टरमध्ये पृथ्वीराज हा  नाकात रिंग, इअरिंग्स आणि गळ्यात चोकर आणि कपाळावर टिळा अशा लूकमध्ये दिसत आहे. पृथ्वीराजच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वधले आहे. अनेक नेटकऱ्यांनी पृथ्वीराजच्या या लूकचं कौतुक केलं आहे.


होंबळे फिल्म्सने ट्विटरवर ‘सालार’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून पृथ्वीरा22जला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, "वर्धराजा मन्नार द किंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा"






पृथ्वीराजने ट्विटरवर  संपूर्ण 'सलार' चित्रपटाच्या टीमचे आभार मानले. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, ''धन्यवाद, होंबळे फिल्म्स, प्रशांत नील, प्रभास आणि सालारच्या संपूर्ण टीमचे आभार! '. 






'सालार' चित्रपटाची स्टार कास्ट


'सालार' या चित्रपटामध्ये पृथ्वीराज हा वर्धराजा मन्नार ही भूमिका साकारत आहे. पृथ्वीराज सुकुमारनसोबतच श्रुती हासन आणि प्रभास देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जगपती बाबू, टिन्नू आनंद, ईश्‍वरी राव, श्रिया रेड्डी आणि रामचंद्र राजू यांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.


सालार कधी होणार रिलीज?


सालार हा चित्रपट आधी  28 सप्टेंबर रोजी रिलीज होणार होता. पण नंतर या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली. आता हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


पृथ्वीराजचे आगामी चित्रपट


'सालार' या चित्रपटाच्या व्यतिरिक्त, पृथ्वीराज  हा 'थलापथी 67' नावाच्या तेलगू चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पृथ्वीराजच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या:


Kaduva : चित्रपटातील वादग्रस्त डायलॉगमुळे अभिनेता पृथ्वीराजला मागावी लागली माफी; पोस्ट केली शेअर