Kaduva : अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) यांचा कडुवा (Kaduva) हा चित्रपट 7 जुलै रोजी रिलीज झाला. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. रिलीज झाल्यानंतर चार दिवसांनी या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 15 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. पण चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटातील एका डायलॉगमुळे अभिनेता पृथ्वीराजला माफी मागावी लागली. या डायलॉगवर अनेकांनी अक्षेप घेतल्यानंतर हा डायलॉग चित्रपटामधून हटवण्यात आला.
काय आहे प्रकरण?चित्रपटातील एका डायलॉगमुळे वाद निर्माण झाला आहे. या डायलॉगमुळे पृथ्वीराज आणि चित्रपट निर्मात्यांना अनेकांनी ट्रोल केले. दिव्यांग मुलांच्या पालकांनी या चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटिस देखील पाठवली आहे. दिव्यांगजनचे राज्य आयुक्त एसएच पंचपाकेसन यांनीही 'कडूवा'चे दिग्दर्शक शाजी कैलास आणि निर्माती सुप्रिया मेनन-लिस्टिन स्टीफन यांना नोटीस पाठवून या प्रकरणावर उत्तर मागितले आहे. त्यानंतर अभिनेता पृथ्वीराजनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन माफी मागितली आहे.
पृथ्वीराजची पोस्टकडुवा चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेला अभिनेता पृथ्वीराजनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन माफी मागितली आहे. पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'सॉरी. ही आमची चुक आहे. आम्ही ही चुक मान्य करतो.' कडुवा या चित्रपटामध्ये पृथ्वीराजनं कडुवाक्कुन्नल कुरुवचन ही भूमिका साकारली आहे. आता या चित्रपटामधील तो वादग्रस्त डायलॉग काढून टाकला आहे. पृथ्वीराजच्या जन गण मन या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
हेही वाचा: