Hema Malini Birthday Party : बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांचा 75 वा वाढदिवस बॉलिवूडकरांनी धुमधडाक्यात साजरा केला आहे. 'बर्थडे आहे 'ड्रीमगर्ल'चा जल्लोष आहे आमचा', असं म्हणत बॉलिवूडकरांनी हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली. पण सनी देओल (Sunny Deol) मात्र अनुपस्थित होता. त्यामुळे सनी देओलला हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाचं निमंत्रण नव्हतं का? अशा चर्चांना सुरुवात झाली. 


हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाला सलमान खान, जया बच्चन, रेखा, रानी मुखर्जी, जॅकी श्रॉफ, आयुष्मान खुरानासह अनेक बॉलिवूडकरांनी हजेरी लावली. हेमा मालिनी यांनी त्यांची लेक आणि धर्मेंदच्या उपस्थित आपला वाढदिवस साजरा केला. पण सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल (Bobby Deol) मात्र या वाढदिवसाला हजर नव्हते. 


हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाला सनी देओल अनुपस्थित!


हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्या सर्वकाही ठिक असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. पण तरीही हेमा मालिनी यांच्या 75 व्या वाढदिवसाला सनी देओल हजर नव्हता. आता समोर आलेल्या माहितीनुसार, सनी देओलला हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाचं आमंत्रण मिळालं होतं. सनी देओलने हेमा मालिनी यांना खास पुष्पगुच्छही पाठवला आहे. पण शूटिंगमुळे त्याला वाढदिवसाला हजर राहायला जमलं नाही. 






हेमा मालिनी यांच्या 75 व्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण सनी देओल फोटोंमध्ये न दिसल्याने नेटकऱ्यांनी हेमा आणि सनी देओल यांचं बिनसलं असल्याच्या चर्चांना सुरुवात केली. तर सनी देओलने आपला लेक करण देओलच्या लग्नाला हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींना न बोलावल्याने अभिनेत्रीने तिच्या वाढदिवसाला सनीला आमंत्रण न दिल्याच्या चर्चा रंगल्या. 


हेमा मालिनींच्या वाढदिवसाला बॉलिवूडकरांची हजेरी!


सलमान खान, जॅकी श्रॉफ, रेखा, अनुपम खेर, धर्मेंद्र, शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी, रानी मुखर्जी, माधुरी दीक्षित, रवीना टंडन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाला उपस्थित होते. बॉलिवूडकरांनी हेमा मालिनी यांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या 'ड्रीमगर्ल'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


संबंधित बातम्या


Hema Malini : हातात चाकू घेऊन पाकिस्तानी फॅन शिरला हेमा मालिनी यांच्या घरात, धक्क्याने वडिलांनी गमावला जीव