Preity Zinta on Bollywood : बॉलीवूडचं (Bollywood) 90चं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये प्रीती झिंटाचं (Priti Zinta) नाव आवर्जुन घेतलं जातं. बॉलीवूडची डिंपल गर्ल अशी ओळख असलेल्या प्रीतीने अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शाहरुख खान (Shah Rukh Khan), रितीक रोशन (Ritik Roshan) यांच्यासोबतच्या तिच्या कमेस्ट्रीने तर तरुणाईच्या मनात एक वेगळी क्रेज निर्माण केली होती. बॉलीवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करताना या अभिनेत्रीने बॉलीवूडबाबतच एक वक्तव्य केलं.
बॉलीवूडबाबत अनेकदा अनेक अभिनेत्री या नकारात्मक प्रतिक्रिया देत असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच बॉलीवूडमध्ये नेपोटीझम हा देखील नेहमी चर्चेचा विषय असतो. त्यातच आता प्रीती झिंटाचं देखील एक वक्तव्य असंच चर्चेत आलं आहे. बॉलीवूड मुलींसाठी सुरक्षित नसल्याचं म्हणत तिने बॉलीवूडबाबत आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री क्रिती सेनन हीने देखील बॉलीवूडबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता प्रीती झिंटाचं हे वक्तव्य चांगलच चर्चेत आलं आहे.
प्रीती झिंटा काय म्हणाली?
प्रीती झिंटाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. यावेळी तिने म्हटलं की, कोणतीही बॅकग्राऊंड नसलेल्या मुला किंवा मुलींसाठी बॉलीवूड सुरक्षित नाही. फक्त फिल्मीच नाही, तर कोणतंही बॅकग्राऊंड नसलेल्या लोकांनी बॉलीवूडमध्ये येऊ नये. इथे असे अनेक लोक आहेत, जे काम मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होतात. अशात जर मी रस्त्याच्या मधोमध उभी राहून म्हणाले की आ बैल मुझे मार तर काय होईल? सध्या प्रीतीच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या हंगामामुळे प्रीती झिंटा बरीच चर्चेत आलीये. दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रीतीने रोहित शर्मावर केलेल्या वक्तव्यामुळे बरीच चर्चेत आली होती. जर रोहित शर्मा आयपीएलच्या लिलावात उतरला तर त्याला माझ्या संघात घेण्यासाठी मी जावाची बाजी लावेन, असं तिनं म्हटलं होतं. प्रीती आयपीएलमधील पंजाबच्या संघाची मालकीण आहे.