Kiran Rao Aamir Khan :  घरात बाळ जन्माला येणे ही त्या कुटुंबीयांसाठी आनंद देणारी गोष्ट असते. आई होताना गरोदर स्त्रियांना खूपच काळजी घ्यावी लागते. गर्भपात झाल्यास त्याचे दु:ख वेदना त्यांच्या मनावर राहण्याची भीती असते. चित्रपट निर्मिती-दिग्दर्शक किरण रावने (Kiran Rao) नुकत्याच दिलेल्या एका  मुलाखतीत आपल्या गर्भपाताच्या घटनेबाबत सांगितले. आझादच्या जन्माआधी अनेक वेदना, त्रासातून जावं लागलं असल्याचे किरणने सांगितले.  किरण रावने आझादच्या जन्माआधी गर्भपात झाले असल्याचे मुलाखतीत म्हटले. किरण रावने आमिर खानसोबत 2005 मध्ये विवाह केला. त्यानंतर 2011 मध्ये सरोगसीद्वारे आझादला जन्म देऊन आई झाली.


किरण राव आणि आमिर खानचा आता घटस्फोट झाला आहे. दोघेही एकत्रपणे आझादचे पालक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. 'झूम एंटरटेन्मेंट'ला दिलेल्या मुलाखतीत किरण रावने सांगितले की, धोबी घाट चित्रपटाची निर्मिती ज्या वर्षी झाली, त्याच वर्षी आझादचा जन्म झाला होता. आझादच्य जन्माआधी आरोग्यविषयक अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. किरण रावने सांगितले की, त्यांनी बाळासाठी खूप प्रयत्न केले होते.


बाळासाठी खूप वेळा प्रयत्न केले, पण...


'धोबी घाट'ची निर्मिती ज्या वर्षी झाली त्याच वेळेस आझादचा जन्म झाला असल्याचे सांगत किरण रावने म्हटले की, बाळासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पाच वर्षांत माझा अनेक वेळेस गर्भपात झाला.  वैयक्तिक आणि आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. बाळ होणे माझ्यासाठी खूप कठीण जात होते. मी खरोखरच मूल होण्याची वाट पाहत होते. त्यामुळे आझादचा जन्म झाला तेव्हा मला करिअरच्या अनुषंगाने कोणताही निर्णय घ्यावा लागला नाही. मला माझ्या मुलाचे संगोपन करायचे होते. 






आझादच्या जन्माच्या 10 वर्षानंतर किरणचे कमबॅक






आझादच्या जन्मानंतर किरण रावने चित्रपट दिग्दर्शन करणे सोडून दिले. मात्र,  आता 10 वर्षानंतर तिने दिग्दर्शनात पुनरागमन केले आहे. 'लापता लेडीज' या चित्रपटातून तिने दिग्दर्शक म्हणून दमदार पुनरागमन केले. या चित्रपटाचे चांगलेच कौतुक झाले.