Prathamesh Parab Shitija Ghosalkar Wedding : प्रथमेश परब (Prathamesh Parab) हा मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. गेल्या काही दिवसांपासून तो लग्नामुळे चर्चेत आहे. प्रथमेशच्या घरी आता लगीनघाईला सुरुवात झाली आहे. प्रथमेश लवकरच गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत (Shitija Ghosalkar) लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाचा मुहूर्त आता ठरला आहे.
प्रथमेशला लागलं क्षितिजाचं वेड
'मला वेड लागले प्रेमाचे' असं म्हणणारा दगडू आता खऱ्या आयुष्यात प्रेमात पडला आहे. दगडूची रिअल प्राजक्ता ही क्षितिजा घोसाळकर आहे. अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितिजाने संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथमेशने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
प्रथमेश परबने मागच्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला तो क्षितिजा घोसाळकरसोबत साखरपुडा करणार आहे आणि त्यानंतर लगेचच दोघांचं लग्न होणार आहे. त्यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
प्रथमेशच्या लग्नाचा मुहूर्त ठरला
प्रथमेश परब आणि क्षितिजाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत साखरपुडा आणि लग्नाची तारीख जाहीर केली आहे. 14 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांचा साखरपुडा होणार आहे. त्यानंतर लगेचच 10 दिवसांनी 24 फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. प्रथमेशच्या लग्नाला आता फक्त एक महिना बाकी आहे.
प्रथमेश परबसाठी व्हॅलेंटाईन डे खास
अभिनेता प्रथमेश परबसाठी व्हॅलेंटाईन डे खूपच खास आहे. यासंदर्भात त्याने खास पोस्टदेखील शेअर केली होती. त्याने लिहिलं होतं,"व्हॅलेंटाईन डेचं आमच्या रिलेशनमध्ये विशेष स्थान आहे. म्हणजे आमचा या कंसेप्टवर विश्वास नाही. पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टी खूप खास बनतात. 14 फेब्रुवारी 2020 रोजी मी क्षितिजाची व्हॅलेंटाईन डे स्पेशल सीरिज पाहिली आणि तिला मेसेज केला होता. 14 फेब्रुवारी 2021 रोजी आम्ही रिलेशनमध्ये आलो. 14 फेब्रुवारी 2022 रोजी आमच्या रिलेशनला एक वर्ष पूर्ण झालं. 14 फेब्रुवारी 2023 रोजी आम्ही आमचं रिलेशन जगजाहीर केलं. येत्या 14 फेब्रुवारीला आमच्या रिलेशनला तीन वर्षे पूर्ण होत असून त्या दिवशी आम्ही साखरपुडा करणार आहोत".
संबंधित बातम्या