Prathamesh Parab Wedding : 'दगडू'ला अखेर खऱ्या आयुष्यातील प्राजू भेटली आहे. 'आई बाबा आणि साईबाबाची शपथ, अरे आपण गरीब हुए तो क्या, दिलसे हम अमीर है अमीर', अशा एकापेक्षा एक डायलॉगच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रथमेश परब (Prathamesh Parab) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर केळवणाचा फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 


प्रथमेश परबची खास पोस्ट (Prathamesh Parab)


प्रथमेश परबने होणाऱ्या पत्नीसोबतचा केळवणाचा फोटो शेअर करत खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने लिहिलं आहे,"#pratija चं ठरलंय हा! बाकी तारीख लवकरच कळवतो. तारीख खूपच स्पेशल आहे. हिंट कॅप्शनमध्येच आहे. नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा". या पोस्टवर यंदा कर्तव्य आहे, केळवण स्टोरीज, लग्न, साखरपुडा, तयारी सुरू असे हॅशटॅगही त्याने दिले आहेत. या पोस्टवर चाहत्यांनी 14 फेब्रुवारी 2024 रोजी प्रथमेश लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.






दगडूची रिअल प्राजक्ता आहे तरी कोण?


प्रथमेश परबच्या गर्लफ्रेंडचं नाव क्षितिजा घोसाळकर (Kshitija Ghosalkar) आहे. एबीपी माझासोबत आपल्या होणाऱ्या पत्नीबद्दल बोलताना प्रथमेश परब म्हणाला,"कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये क्षितिजा काम करते. ती शिक्षिका आहे. क्षितिज आणि माझं लव्हमॅरेज आहे. इंस्टाग्रामवर आम्ही आधी भेटलो. गप्पा मारताना आमची छान मैत्री झाली. 'टाईमपास 3'च्या शूटिंगदरम्यान आम्ही ठाण्यात पहिल्यांदा भेटलो. पुढे आमच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि आता आम्ही संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे". क्षितिजा 'टाइमपास 3'च्या प्रीमियरलादेखील हजर होती. काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनच्या चर्चा सुरू आहेत.


प्रथमेश परबबद्दल जाणून घ्या...


प्रथमेश परब हा मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. 'बालक पालक', 'टाइमपास', 'टकाटक' अशा अनेक सिनेमांत प्रथमेशने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. त्याने साकारलेला दगडू हा मात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चाहत्यांना आता प्रथमेशच्या लग्नाची प्रतीक्षा आहे. सोशल मीडियाच्या  माध्यमातून चाहते अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 


संबंधित बातम्या


Prathamesh Parab : बाप्पाच्या आशीर्वादासाठी जशी गर्दी होते तशी आमच्या सिनेमासाठीही व्हावी; प्रथमेश परबचं बाप्पाकडे मागणं