Sairat Movie Zing Zing Zingat Song : 'सैराट' (Sairat) हा सिनेमा 29 एप्रिल 2016 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. नाजराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. 'सैराट' या सिनेमातील गाणी अजय-अतुल या आघाडीच्या संगीतकारांनी संगीतबद्ध केली आहेत. याड लागलं, आताच बया का बावरलं, सैराट झालं जी, झिंगाट अशी सिनेमातील सर्वच गाणी सुपरहिट ठरली आहेत. 


'सैराट' हा सिनेमा प्रदर्शित होऊन अनेक वर्षे झाली आहेत. पण या सिनेमाची आणि त्यातील गाण्याची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे.'झिंग झिंग झिंगाट' या गाण्याचे बोल प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. आजही या गाण्यावर तरुणाई थिरकताना दिसते. 


तरुणाईला वेड लावणारं 'झिंग झिंग झिंगाट'


'झिंग झिंग झिंगाट'च्या संगीत निर्मितीसाठी जगातील सर्वात मोठा सोनी स्कोरींग स्टेज, 45 स्ट्रींग सेक्शन, जगातील 66 सर्वोत्कृष्ट संगीतकार, 6 पीस वुडवीन्ड्स, 3 ट्रम्पेट, 3 ट्रॉम्बोन, 1 टुबा आणि 1 हार्प अशा साहित्याचा वापर करण्यात आला आहे. अजय-अतुल यांनी 'झिंग झिंग झिंगाट'ची पटकथा ऐकल्यापासून या सिनेमाच्या संगीतासाठी त्यांनी लॉस एन्जलीस येथील लोकप्रिय असणाऱ्या सोनी म्युझिक स्टुडिओचा विचार केला. 


'झिंग झिंग झिंगाट' या गाण्याने तरुणाईला वेड लावलं आहे. मराठमोळी आणि पाश्चात्य अशा दोन्ही वाद्यांची सांगड या गाण्यात घालण्यात आली आहे. 'झिंगाट' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. गावरान भाषा आणि लोकसंगीताची छाप या गाण्यात पाहायला मिळते. 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्याचे तीन दिवस शूटिंग सुरू होते. 


'झिंग झिंग झिंगाट'चे लिरिक्स काय आहेत? (Zingat Lyrics)


उरात होतंय धड धड लाली गालावर आली
आन अंगात भरलंय वारं ही पिरतीची बाधा झाली


आता अधीर झालोया, बघ बधिर झालोया
आन तुझ्याचसाठी बनून मजनू मागं आलुया
उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट, रंगात आलंया
झालं झिंग झिंग, झिंग झिंग, झिंग झिंग झिंगाट
झिग झिंग, झिग झिंग, झिंग झिंग झिंगाट
झिग झिंग, झिग


झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
झिंग झिंग, झिंग झिंग, झिग झिंग झिंगाट
झिग झिंग, झिग


आता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं
तुझ्या नावाचं मी इनिशल टँटूनं गोंदलं


हात भरून आलोया, लई दुरून आलोया
आन करून दाढी भारी परफ्युम मारून आलोया
आगं समद्या पोरात, म्या लई जोरात रंगात आलंया
झालं झिंग झिंग, झिंग झिंग, झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग, झिग झिंग, झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग, झिंग


झालं झिंग झिंग, झिग झिंग, झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग, झिंग झिंग, झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग, झिंग


समद्या गावाला झालिया माझ्या लगनाची घाई
कधी व्हनार तू रानी माझ्या लेकराची आई


आता तराट झालुया तुझ्या घरात आलुया
लई फिरून बांधावरून कल्टी मारून आलोया
आगं ढिंच्याक जोरात टेक्नो वरात दारात आलोया
झालं झिंग झिंग, झिग झिंग, झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग, झिग झिंग, झिंग झिंग झिंगाट
झिग झिंग, झिग


झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
झिंग झिंग, झिंग झिंग, झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग, झिंग


संबंधित बातम्या


Rinku Rajguru Real Name: 'तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे?', 'तुझं खरं नाव काय?'; नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना रिंकूनं दिली उत्तरं