Prashant Damle Love Story : प्रशांत दामले (Prashant Damle) हे मराठी रंगभूमीवरील बहुरुपी अभिनेते आहेत. आजवर त्याने अनेक नाटकं, मालिका, सिनेमे आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. रंगभूमीवर वेगवेगळ्या भूमिका साकारणारे प्रशांत दामले पहिल्याच भेटीत गौरी दामले (Gauri Damle) यांच्या प्रेमात पडले होते. प्रशांत दामले यांच्या आयुष्यात पत्नी गौरी दामले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 


प्रशांत दामलेच्या सुखी संसाराचं रहस्य काय? 


गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान प्रशांत दामलेंनी त्यांच्या सुखी संसाराचं रहस्य सांगितलं आहे. प्रशांत दामले म्हणाले,"मला वाटतं वैयक्तिक आयुष्यात सगळे नियम व अटी लागू होऊ शकत नाहीत. पण नियम आणि अटी डोक्यात असायला हव्यात. कोणत्या वेळी पतीसोबत कोणती गोष्टी बोलायची ती कशापद्धतीने बोलायची याचं अचूक टायमिंग असायला हवं. एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं गरजेचं आहे. 


एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व प्रशांत दामले


प्रशांत दामले एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे. आजवर त्यांनी 10 हजारापेक्षा अधिक नाटके, 40 हून अधिक सिनेमे आणि 25 मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या नावावर पाच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डदेखील आहेत. प्रशांत दामलेंना बालपणापासूनच अभिनयाची गोडी लागली होती. त्यामुळे शाळेत असतानाच त्यांनी आंतरशालेय नाटुकल्यांमध्ये काम करायला सुरुवात केली. पुढे 'टूर टूर' या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी व्यावसायिक मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. आज प्रशांत दामले मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. 






प्रशांत दामलेंच्या नाटकांबद्दल जाणून घ्या... (Prashant Damle Drama)


प्रशांत दामलेंची अनेक नाटकं गाजली आहेत. आजही त्यांच्या नाटकांना प्रेक्षक तुफान गर्दी करतात. सध्या त्यांच्या 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' (Eka Lagnachi Dusri Goshta) या नाटकाचे दुबईत प्रयोग सुरू आहेत. 'टूर टूर', 'गेला माधव कुणीकडे' (Gela Madhav KUnikade), 'मोरुची मावशी', 'ब्रह्मचारी', 'लग्नाची बेडी' (Lagnachi Bedi), 'चार दिवस प्रेमाचे' (Char Divas Premache), 'सुंदर मी होणार' (Sundar Me Honar), 'बहुरुपी' अशी त्यांची अनेक नाटके गाजली आहेत. नाटकात काम करण्यासोबत अनेक दर्जेदार नाटकांची निर्मितीदेखील त्यांनी केली आहे. 


संबंधित बातम्या


Prashant Damle : मराठी नाट्य परीषदेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रशांत दामलेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट