Pasoori Nu Reactions : पाकिस्तानी गायक अली सेठी (Ali Sethi)  आणि शेह गिल (Shae Gill) यांचे 'पसूरी' हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. कोक स्टुडिओचे हे गाणे अनेक महिन्यांपासून प्रत्येक म्युझिक प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होत आहे. आता 

  कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)   आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'पसूरी' या गाण्याचे 'पसूरी नू' (Pasoori Nu) हे  रिमेक व्हर्जन रिलीज केलं आहे. 'पसूरी नू' गाणं रिलीज होताच नेटकऱ्यांनी या गाण्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. पाहूयात 'पसूरी नू' गाण्यावर नेटकऱ्यांनी दिलेली रिअॅक्शन... 


 अरिजीत सिंह आणि तुलसी कुमार यांनी 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटातील  'पसूरी नू'  हे गायलं आहे. या गाण्याला रोचक  कोहली आणि अली सेठी यांनी संगीत दिलं आहे. या गाण्याचे गीतकार  गुरप्रीम सेनी आणि  अली सेठी हे आहेत.  'पसूरी नू'  गाण्याला अनेक नेटकरी ट्रोल करत आहेत. एका नेटकऱ्यानं ट्वीट करत लिहिलं, गाणं असं रिक्रिएट करा की चार लोक शिव्या देण्यापासून स्वत:ला थांबवू शकणार नाहीत.' पाहा नेटकऱ्यांचे ट्वीट्स...


















कधी रिलीज होणार 'सत्यप्रेम की कथा'? 


कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) हा चित्रपट 29 जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भूल भुलैया-2 या चित्रपटानंतर नंतर कार्तिक आणि कियारा यांची जोडी  'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात  पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमात कार्तिक-कियारासह गजराज राव आणि सुप्रिय पाठकदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'सत्यप्रेम की कथा'  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


संबंधित बातम्या


Satyaprem Ki Katha Trailer : 'सत्यप्रेम की कथा'चा ट्रेलर आऊट; कार्तिक-कियाराचा रोमँटिक अंदाज