Prasad Oak : अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, गायक, लेखक, कवी अशी प्रसाद ओकची (Prasad Oak) ओळख आहे. अनेक लोकप्रिय नाटके, मालिका आणि सिनेमांचा प्रसाद ओक भाग आहे. गुणी, हँडसम अभिनेता प्रसाद ओकचा 17 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे.


प्रसाद ओकचा जन्म 17 फेब्रुवारी 1975 रोजी पुण्यात झाला आहे. पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण झाले आहे. पुढे पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयातून त्याने पदवीचं शिक्षण घेतलं. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. 


प्रसाद ओकची कारकीर्द जाणून घ्या.. (Prasad Oak Career)


प्रसाद ओकला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याच्या या पहिल्याच नाटकात श्रीराम लागू आणि निळू फुले महत्त्वाच्या भूमिकेत होते. या नाटकानंतर त्याने 1993 रोजी 'बंदिनी' या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्याची ही मालिका चांगलीच गाजली.


'बंदिनी' या मालिकेनंतर प्रसाद 'अंधाराच्या पारंब्या' या मालिकेत एका वेगळ्या भूमिकेत झळकला. पुढे 'अवघाची संसार' या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला. 2008 मध्ये ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेत प्रसादने हर्षवर्धन भोसले हे पात्र साकारले होते. मराठीसह त्याने हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 


महाराष्ट्राची हास्यजत्रा, दामिनी, घरकुल, चार दिवस सासूचे, अवघाची संसार, भांडा सौख्यभरे, समारंभ, असंभव, आभाळमाया, पिंपळपान, वादळवाट, होणार सून मी या घरची, फुलपाखरू, हम तो तेरे आशिक है, क्राइम पेट्रोल अशा अनेक गाजलेल्या कलाकृतींचा तो भाग आहे.


प्रसादचा सिनेप्रवास (Prasad Oak Movies)


प्रसाद ओकचा पहिला सिनेमा म्हणजे बॅरिस्टर. या सिनेमासह त्याने ऐका दाजिबा, एक डाव धोबी पछाड, लगे रहो मुन्नाभाई, कलियुग, जेहेर, जोशी की कांबळे, पकडापकडी, हरी माझी घरी, हिप हिप हुर्रे, खेळ मांडला, निर्मला, धतिंग धिंगाणा, बाळकडू, डॉक्टर रमाबाई, 7 रोशन व्हिला, शिकारी, आणि डॉ काशिनाथ घाणेकर, ये रे ये रे पैसा, पिकासु, हिरकणी, धुरळा अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमात त्याने साकारलेली आनंद दिघे यांची भूमिका चांगलीच गाजली. सहाय्यक दिग्दर्शक ते आघाडीचा अभिनेता हा प्रसाद ओकचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. 


'अशी' आहे प्रसाद-मंजिरीची लव्हस्टोरी (Prasad Oak Lovestory)


प्रसाद ओक आणि मंजिरी ओकची पहिली भेटच एका अभिनय शिबिरामध्ये झाली होती. हे शिबिर प्रसादनेच आयोजित केलं होतं. तीन महिन्यांच्या या शिबिरादरम्यान प्रसाद-मंजिरीची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला. मराठी मनोरंजनसृष्टीतील पॉवर कपल म्हणून ते ओळखले जातात.


संबंधित बातम्या


Manjiri Prasad Oak : 9 महिन्यांची गरोदर असताना ट्रेनमधून ढकललं अन् पुढे; प्रसाद ओकच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव