Pran Death Anniversary : बॉलिवूडमधील नायक आणि नायिकांप्रमाणे खलनायदेखील लोकप्रिय झाले आहेत. खलनायकाची भूमिका अजरामर केलेल्या प्राण कृष्ण सिकंद अहलुवालिया (Pran Krishan Sikand Ahluwalia) उर्फ प्राण (Pran) यांची आज पुण्यतिथी आहे. 12 फेब्रुवारी 1920 रोजी दिल्लीत जन्मलेल्या प्राण यांनी कधीही अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार केला नव्हता. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या बॉलिवूडला 'प्राण' कसा मिळाला?


प्राण यांना आयुष्यात काहीतरी चांगलं काम करायचं होतं पण नक्की काय करायचं हे त्यांना माहीत नव्हतं. अभ्यासात रस नसल्यामुळे त्यांनी दहावीनंतर शिक्षण सोडलं. सुरुवातीला त्यांनी फोटोग्राफी क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला आणि एका स्टुडिओतमध्ये नोकरी केला. फोटोग्राफी करता करता ते शिमला आणि लाहोरला गेले. 


सिगरेट ओढण्याच्या स्टाईलने रातोरात सुपरस्टार झालेले प्राण


फोटोग्राफीदरम्यान प्राण सिगरेट ओढायला लागले. एके दिवशी ते एका दुकानासमोर हटके स्टाईलमध्ये सिगरेट ओढत होते. त्यावेळी पंजाबी सिनेसृष्टीतील लेखक मोहम्मद वलीही तेथे उपस्थित होते. प्राण यांच्या सिगरेट ओढण्याच्या स्टाईलने ते प्रभावित झाले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी प्राण यांना भेटायला बोलावलं. पण अभिनयात रस नसल्यामुळे प्राण त्यांना भेटायला गेले नाहीत. काही दिवसांनी मोहम्मद वली पुन्हा प्राणला भेटले. त्यावेळी प्राण त्यांची ऑफर नाकारू शकले नाहीत. 


प्राण यांनी 1940 मध्ये 'जट' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. खलनायकाची भूमिका त्यांनी चोख बजावली. त्यामुळे खऱ्या आयुष्यातही लोक त्यांना खलनायकच समजू लागले. प्राण रस्त्यावरुन जात असताना लोक'ओ बदमाश', 'ओ लफंगे', 'अरे गुंडा' असे टोमणे त्यांना मारायचे. त्यांनी खलनायकाची भूमिका अजरामर केली आहे. त्यांचा करारी आवाज आणि भेदक नजर सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 


प्राण यांचा सिनेप्रवास... (Pran Movies)


प्राण यांनी हिंदी मनोरंजनसृष्टीला अनेक अविस्मरणीय सिनेमे दिले आहेत. अभिनेता म्हणून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 1940 ते 1947 दरम्यान प्राण नायक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यानंतर त्यांनी फक्त खलनायकाच्या भूमिका केल्या. प्राण यांनी 350 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. खानदान. पिलपिली साहेब, हलाकू अशा अनेक सिनेमांचा यात समावेश आहे. 'जिद्दी' या सिनेमामुळे खऱ्या अर्थाने त्यांना लोकप्रियता मिळाली. 2000 मध्ये प्राण यांना स्टारडस्टने 'व्हिलेन ऑफ द मिलेनियम' पुरस्काराने सन्मानित केले होते. तर 2013 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


संबंधित बातम्या


12th July In History: करारी आवाज अन् भेदक नजर... बॉलिवूडचा 'प्राण; गेला, प्रभातचा चंद्रसेना चित्रपट प्रदर्शित; आज इतिहासात