Kalank : फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) घणाघाती टीका केली. त्यानंतर ठाकरेंना कलंकीचा काविळ झाला असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर राज्याच्या राजकरणात 'कलंक' (Kalank) या शब्दावरून चांगलेच वातावरण तापले आहे. आज राज्याच्या राजकीय वर्तुळात 'कलंक' या शब्दाची चांगली चर्चा रंगली आहे. त्यानंतर आम्ही कलंक या शब्दाचा नेमका अर्थ काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.


'कलंक' या शब्दाचा समानार्थी शब्द काळिमा, डाग किंवा बट्टा असा आहे. समाज एखाद्या गोष्टीबद्दल असलेल्या नकारात्मक आणि अनेकदा अयोग्य समजुतींचा समूह होय. 'कलंक' हा शब्द सध्या गूगलवर सर्वाधिक सर्च केला जात आहे. 'कलंक' या शब्दावर आधारित सिनेमे आणि गाणीदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 


'कलंक' सिनेमा (Kalank Movie) : 'कलंक' हा नाट्यमय, रोमँटिक सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि वरुण धवन (Varun Dhawan) मुख्य भूमिकेत होते. अभिषेक वर्मनने या सिनेमाच्या दिग्दर्शनची धुरा सांभाळली होती. स्वातंत्र्यपूर्वीच्या काळावर आधारित असलेल्या या सिनेमात माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत होते. जगभरात या सिनेमाने 146.31 कोटींची कमाई केली होती. या सिनेमाचं कथानक, दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 


कलंक मराठी चित्रपट (Kalank Marathi Movie) : विकास भामरे दिग्दर्शित 'कलंक' (Kalank) हा सामाजिक विषयावर भाष्य करणारा मराठी सिनेमा 2007 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात अंजली उजवणे, अरुण नलावडे, कविता घडशी, किशोर नांदलस्कर, छाया कदम, सुनिल गोडसे, स्मिता तांबे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. 


कलंक गाणं (Kalank Song) : 'कलंक' या हिंदी सिनेमातील शीर्षक गीत गायक, संगीतकार अरिजीत सिंहने गायलं आहे. 'कलंक नहीं इश्क है काजल पिया' असे या गाण्याचे बोल आहेत. अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गीत लिहिलं आहे. झी म्यूझिक कंपनीच्या बॅनरअंतर्गत या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. हे गाणं त्यावेळी चांगलच गाजलं होतं. आजही हे गाणं आवडीने ऐकलं जातं. 


'कलंक'चे लिरिक्स जाणून घ्या... 


ना जाने ये जमाना
क्यों चाहे रे मिटाना 
कलंक नहीं
इश्क है काजल पिया
कलंक नहीं
इश्क है काजल पिया


संबंधित बातम्या


'कलंक'वरून राजकीय वाद पेटला; ठाकरे,फडणवीसांसह अंबादास दानवेंमध्ये रंगला ट्विटर'वार'