एक्स्प्लोर
'मर्क्युरी'चा टीजर रिलीज, प्रभू देवाचा भयानक लूक
या चित्रपटात त्याचा भयानक लूक पाहायला मिळणार आहे. बुधवारी चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला.

मुंबई : प्रभू देवाने हिंदी सिनेमात डान्सरनंतर अभिनेता आणि डायरेक्टर म्हणून ओळख निर्माण केली आहे. आता एप्रिलमध्ये प्रभू देवाचा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं नाव आहे 'मर्क्युरी'. या चित्रपटात त्याचा भयानक लूक पाहायला मिळणार आहे. बुधवारी चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला.
टीझरमध्ये प्रभू देवा अतिशय भीतीदायक दिसत आहे. तर चित्रपटाचं साऊंड स्कोअरही या सीनला चपखल बसला आहे. कार्तिक सब्बाराज हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 'जिगरथंडा'साठी त्यांना पुरस्कार मिळाला होता.
'मर्क्युरी' हा चित्रपट सायलेंट थ्रिलर आहे. प्रभू देवाने यापूर्वी अॅक्शन जॅक्सन, सिंग इज ब्लिंग यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. इतकंच नाही तर 'दबंग 3'चं दिग्दर्शनही प्रभू देवाच करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
