Prabhas : "सोच अगर पक्की हो तो तिनका भी तलवार में बदल सकता है..." हा डायलॉग तुम्हाला आठवतो का? हा डायलॉग कोणत्या छोट्या सिनेमातला नसून सुपरहिट ठरलेल्या दाक्षिणात्य सिनेमातील आहे. या सिनेमाने अभिनेत्यालाही सुपरस्टार केलं. 'बाहुबली' (Baahubali) सिनेमाचा विषय निघाला आणि प्रभासचं (Prabhas) नाव आलं नाही, असं होत नाही. कठोर आवाज आणि आपल्या दराऱ्याने प्रभासने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 


अभिनेता होण्याची प्रभासची इच्छा नव्हती...


23 ऑक्टोबर 1979 रोजी एका फिल्मी कुटुंबात जन्मलेल्या प्रभासला कधीच अभिनेता व्हायचं नव्हतं. लहानपणासून सिनेमाचं बाळकडू मिळूनही प्रभासला उद्योगपती व्हायचं होतं. सिनेमांत काम करायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. पण प्रभासचे काका एक सिनेमा बनवत होते. या सिनेमात मुख्य भूमिकेसाठी प्रभास योग्य होता. त्यामुळे अभिनेत्याच्या काकाने त्याला मनवलं आणि अशाप्रकारे प्रभासच्या सिनेप्रवासाला सुरुवात झाली. 


प्रभासने 2000 मध्ये 'ईश्वर' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. पण अभिनेत्याचा 'वर्षम' हा दुसरा सिनेमा मात्र यशस्वी झाला. त्यानंतर प्रभासला सिनेसृष्टीची गोडी निर्माण झाली आणि त्याने अनेक सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखवली. त्यातले काही सिनेमे हिट तर काही सुपरफ्लॉप झाले. 




'बाहुबली' ठरला टर्निंग पॉईंट


सिनेसृष्टीची आवड निर्माण झाल्याने प्रभास अनेक सिनेमांत काम करत असे. दरम्यान त्याला 'बाहुबली' सिनेमासाठी विचारणा झाली. पण या सिनेमासाठी निर्मात्यांनी एक अट ठेवली होती. त्यामुळे प्रोजेक्टसाठी होकार दिल्यानंतर अभिनेत्याला पुढचे पाच वर्ष कोणत्याही सिनेमावर काम करता आले नाही. पण या पाच वर्षांच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं. जगभरात प्रभास लोकप्रिय झाला. 'बाहुबली' हा प्रभासच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. 'बाहुबली 2'लादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.


प्रभास देशभरातील लोकप्रिय अभिनेता असण्यासोबत मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणूनही तो लोकप्रिय आहे. बाहुबलीचा मोठा चाहतावर्ग आहे. प्रभासला आजवर 6000 पेक्षा अधिक मुलींनी प्रपोज केलं आहे. पण प्रभासने कोणालाही होकार दिला नसून तो सिंगल आयुष्य जगत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रभास लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा रंगली होती. 


संबंधित बातम्या


Prabhas Wedding : प्रभास लवकरच अडकणार लग्नबंधनात! जाणून घ्या सुपरस्टार कधी चढणार बोहल्यावर?