Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडीत (Tejaswini Pandit) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिकिनी घालण्यावरुन अनेकदा मराठमोळ्या अभिनेत्रींना ट्रोल केलं जातं. आता यावर तेजस्विनी पंडीतने आपलं मत मांडलं आहे.


तेजस्विनी पंडीतने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत मराठी अभिनेत्रींच्या बिकिनी घालण्याबद्दल आपलं परखड मत मांडलं आहे. तेजस्विनी म्हणाली,"सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनवर पैसे आकारायला हवेत. प्रत्येक कमेंटचे 10 रुपये. तरचं या गोष्टी बदलू शकतात. माझं शरीर चांगलं आहे. मला आवडतात हे कपडे. जर मी असे कपडे घातले तर त्याच काहीच गैर नाही". 


तेजस्विनी पुढे म्हणाली,"स्विमिंग पूलमध्ये बिकिनी घालणार नाही मग कुठे घालणार? जगण्याच्या दोन पद्धती आहेत. एक पद्धत तुमच्या पद्धतीने आणि दुसरी लोकांच्या पद्धतीने. मग तसं वागलं पाहिजे. बिकिनी घातली घातलेले फोटो सोशल मीडियावर टाकल्यास त्या फोटोखालील कमेंट पाहायच्या नाहीत. नेटकऱ्यांनी ट्रोल केलं तरी त्या गोष्टीचा फरक पडला नाही पाहिजे. नाहीतर मग लोकांना हवं तसं वागा". 


तेजस्विनी पंडीत लग्न कधी करणार? 


लग्न कधी करणार? याबद्दल बोलताना तेजस्विनी पंडीत म्हणाली,"आता मी आयुष्यात सेटल झाले आहे. त्यामुळे माझं लग्न आणि माझ्या आयुष्यात पुरुष असणं हे माझ्या सेटल होण्याची कारणं नाहीत. सध्या मी मजेत असून माझ्या कुटुंबाचादेखील चांगला सांभाळ करत आहे. करिअरवर फोकस आहे. आयुष्यात बरचं काही करत आहेत. यासाठी मला कोणत्याही पुरुषाच्या पावतीची गरज नाही". 


तेजस्विनी पंडीतचा क्रश कोण? 


तेजस्विनी पंडीत तिच्या क्रशबद्दल सांगताना म्हणाली,"अंकुश चौधरी माझा क्रश होता. अखेर मला त्यांच्यासोबत काम करता आलं. एका जाहिरातीसाठी मी ऑडिशन दिलं होतं. त्यावेळी 30-36 मुलींमधून माझी निवड झाली आणि मला अंकुश चौधरी यांच्यासोबत काम करता आलं. त्यावेळी माझ्या टोपीवर मी त्यांची सही घेतली होती".


तेजस्विनी पंडीत एक अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहेच. पण आता निर्मिती क्षेत्रातही तिने पदार्पण केलं आहे. 'बांबू' हा निर्मिती म्हणून तिचा पहिला सिनेमा आहे. तसेच 'अथांग' या वेबसीरिजची निर्मितीही तिने केली आहे. 'तू ही रे','येरे येरे पैसा','अगं बाई अरेच्चा' आणि 'फॉरेनची पाटलीण' अशा अनेक सिनेमांत तेजस्विनी पंडीतची झलक पाहायला मिळाली आहे.  


संबंधित बातम्या


Tejaswini Pandit: "राज ठाकरे हे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे"; तेजस्विनी पंडितच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष