Prabhas Movis Big Records : 'बाहुबली' फेम सुपरस्टार प्रभासचे देशविदेशात लाखो चाहते आहेत. प्रभासकडे सध्या अनेक दिग्दर्शकांची रांग लागली आहे. प्रभासकडे एकामागोमाग एक चित्रपटांच्या ऑफर येत आहेत. प्रभासचे पुढील तीन वर्षांसाठीचे प्रोजेक्ट बूक झाले आहेत. प्रभासला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. चाहते प्रभासच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभास नेहमी मोठा पडद्यावर येतो आणि धमाका करतो. प्रभासने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले आहेत. प्रभासने केलेले रेकॉर्ड्स मोडणं सलमान खान, आमिर खान आणि ह्रतिक रोशनलाही कठीण जाणार आहे. प्रभासच्या नावावर असलेले हे रेकॉर्ड्स कोणते जाणून घ्या.


पहिला रेकॉर्ड


प्रभासच्या नावावर 1000 कोटींच्या दोन चित्रपटांचा रेकॉर्ड आहे. अभिनेता प्रभासचे एक नव्हे तर दोन 1000 कोटींचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले आहेत. 'बाहुबली 2 : द कन्क्लुजन' चित्रपटातून प्रभासने पहिल्यांदा 1000 कोटींचा आकडा गाठला. त्यानंतर 'कल्की 2898 एडी' चित्रपटानेही 1000 कोटींचा टप्पा पार केली


दुसरा रेकॉर्ड 


अभिनेता प्रभासने 'कल्की 2898 एडी' चित्रपटाद्वारे जगभरात मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. अभिनेता प्रभास याच्याकडे आता 'आंतरराष्ट्रीय सिनेमा आयकॉन' म्हणून पाहिलं जात आहे. 'कल्की' चित्रपटाने फक्त भारतातच नाही, तर परदेशातही प्रचंड नफा कमावला आहे.


तिसरा रेकॉर्ड


अभिनेता प्रभासचे आकर्षण केवळ भारतापुरतेच मर्यादित नाही तर परदेशातील लोकही त्याचे चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. परदेशातही त्याच्या चित्रपटांचा मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. प्रभासच्या 'बाहुबली 2 : द कन्क्लुजन' या चित्रपटाने परदेशात चांगला व्यवसाय केला. 'बाहुबली 2 : द कन्क्लुजन' ने परदेशात 396.5 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. या यादीत 'कल्की 2898 एडी' चित्रपटानेही परदेशात बंपर कमाई केली आहे.


चौथा रेकॉर्ड


प्रभासचे चित्रपट आणि बिग बजेट हे जणू समीकरणच बनलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रभासचा 'आदिपुरुष' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही पण हा चित्रपट बनवण्यासाठी 650 कोटींहून अधिक खर्च आला होता. याशिवाय प्रभासच्या इतर चित्रपटांचे बजेटही सहज 500 कोटींच्या पुढे असते. सध्या प्रभासकडे 500 कोटींच्या बजेटचे अनेक चित्रपट आहेत.


पाचवा रेकॉर्ड


निर्माते आणि निर्माते यांचा अभिनेता प्रभासवर भरपूर विश्वास आहे. त्यामुळे प्रभासचं नाव आलं की, निर्माते 500-600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यापूर्वी अजिबात घाबरत नाहीत. तर सलमान खान आणि आमिर खान यांनी अद्याप 500 कोटींच्या जवळपास बजेट असणारा एकही चित्रपट केलेला नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


ऐश्वर्या रायच्या वाढदिवसाला अभिषेक बच्चन गैरहजर, बर्थडे पार्टी टाळण्याचं समोर आलं मोठं कारण