Abhishek Bachchan Missed Aishwarya Rai Birthday : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. या दोघांच्या नात्यास दुरावा आल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. दोघेही एकत्र कार्यक्रमांना हजेरी लावत नाही. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नात अभिषेक आणि ऐश्वर्या वेगवेगळे पोहोचले होते. त्यांनी एकमेकांसोबत फोटोही काढला नाही. यामुळेच या दोघांचं बिनसलं असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतरही दोघे एकत्र दिसले नाहीत. आता अलिकडेच ऐश्वर्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्येही अभिषेक बच्चन दिसला नाही. आता यामागचं मोठं कारण समोर आलं आहे.


ऐश्वर्याच्या वाढदिवसाला अभिषेक गैरहजर


अभिनेत्री ऐश्वर्या रायचा 1 नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. तिचाय वाढदिवसाच्या दिवशी अभिषेक किंवा बच्चन कुटुंबाने तिला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या नाहीत. अभिषेक बच्चन किंवा बच्चन कुटुंब ऐश्वर्यासोबत वाढदिवस साजरा करताना दिसले नाहीत. यावरुनच ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटांच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात होतं. अभिषेकने ऐश्वर्याच्या वाढदिवसाला रोमँटिक पोस्टही केली नाही आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. यानंतर अभिषेक  आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली. पण, आता अभिषेक ऐश्वर्याच्या वाढदिवसाला नसण्यामागचं कारण समोर आलं आहे.


'या' कारणामुळे अभिषेक गैरहजर 


दुबईमध्ये 1 नोव्हेंबरला ऐश्वर्या राय बच्चनच्या 51 व्या वाढदिवसाच्या पार्टीला अभिषेक बच्चनच्या गैरहजेरीमुळे त्यांच्या घटस्फोटाबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या. आता या अफवांना पूर्णविराम देत अभिषेक बच्चनच्या गैरहजेरीचं कारण समोर आले आहे. ऐश्वर्याच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिषेक भोपाळमध्ये असल्याचं समोर आलं आहे. भोपाळमध्ये कौटुंबिक प्रकरण निपटवण्यात व्यस्त होता. अभिषेकची आजी इंदिरा भादुरी म्हणजे जया बच्चन यांची आई यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.


आजीसोबत होता अभिषेक बच्चन 


ऐश्वर्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्यासोबत राहण्याची इच्छा असूनही, अभिषेकने आजीच्या आजारपणात तिच्यासाठी भोपाळमध्ये राहणं पसंत केल. एका जवळच्या कौटुंबिक सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अभिषेकचे आई-वडील, अमिताभ आणि जया आपापल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त होते, म्हणून अभिषेकला त्याच्या आजीची काळजी घेण्यासाठी भोपाळमध्ये थांबावं लागल्याची माहिती समोर आली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपनंतर मलायकाची क्रिप्टिक पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक सकारात्मक विचार..."