Anushka Shetty Upcoming Ghaati Movie Teaser : सुपरस्टार अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित घाटी चित्रपटातील पहिला लूक समोर आला आहे. अनुष्का शेट्टीच्या आगामी घाटी चित्रपटाचा दमदार लाँच करण्यात आला आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी सिनेसृष्टीतील कुशल कलाकारांपैकी एक आहे. ती वास्तववादी आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. आता अनु्ष्का शेट्टीच्या आगामी चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. अनुष्का शेट्टीच्या आगामी घाटी चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. घाटी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून या टीझरला आतापर्यंत 9.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.


डोळ्यात अंगार, तोंडात सिगार


अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या बहुप्रतिक्षित 'घाटी' चित्रपटातील (Ghaati Teaser) फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला. घाटी चित्रपटाचा टीझर रिलीज होताच चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बाहुबली चित्रपटानंतर अनुष्का शेट्टी धमाकेदार पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.'घाटी' चित्रपटात अनुष्का शेट्टीशिवाय इतरही अनेक स्टार्स दिसणार आहेत. अनुष्का शेट्टीच्या आगामी घाटी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन क्रिश जगरलामुडी यांनी केलं आहे, तर फर्स्ट फ्रेम एंटरटेनमेंट्स अंतर्गत राजीव रेड्डी आणि साई बाबू जगरलामुडी यांनी याची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे संगीत नागवेल्ली विद्या सागर यांनी दिले आहे. 






अनुष्का शेट्टीच्या घाटी सिनेमातील दमदार भूमिकेची झलक


घाटी हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या या फर्स्ट लूकमध्ये अनुष्का शेट्टीची दमदार शैली आणि चित्रपटाचा ग्रँड स्केल दिसून येते. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर लोकप्रिय झाला असून, या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ranu Mondal Birthday : रेल्वे स्टेशनवरील व्हायरल व्हिडीओमुळे बनली स्टार, भिकारी ते रातोरात सेलिब्रिटी होण्यापर्यंतचा प्रवास; रानू मंडलची परिस्थिती पुन्हा जैसे थे