एक्स्प्लोर

ऑस्कर ॲकॅडमीचे कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत सकारात्मक : जॉन बेली

मुंबईत कार्यालय सुरु केल्यास येथे आशियातले एक केंद्र म्हणून या केंद्राकडे पाहता येईल. त्यामुळे भारतातून परतल्यानंतर आपल्या ऑस्कर ॲकॅडमीच्या बैठकीत मुंबईतील कार्यालयाबाबत आपण प्रस्ताव ठेवू असे बेली यांनी सांगितले.

मुंबई : अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सची (ऑस्कर ॲवार्ड्स) ख्याती जगभरात असून ऑस्कर ॲकॅडमीचे कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत सकारात्मक असल्याचे ऑस्कर ॲकॅडमीचे अध्यक्ष जॉन बेली यांनी आज सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेस ऑस्कर ॲवॉर्डसचे अध्यक्ष जॉन बेली, त्यांच्या पत्नी आणि ऑस्कर ॲकॅडमीच्या गर्व्हनर कॅरल लिटलटन, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उज्ज्वल निरगुडकर उपस्थित होते.

सध्या भारतात सर्वाधिक सिनेमांची निर्मिती केली जाते. त्यामुळेच या बॉलिवूड नगरी असलेल्या भारतात पहिल्यांदा येत असताना अत्यंत आनंद होत आहे. ऑस्कर ॲकॅडमीचे सध्या लंडन आणि युरोप येथे कार्यालय आहे. मात्र मुंबईत कार्यालय सुरु केल्यास येथे आशियातले एक केंद्र म्हणून या केंद्राकडे पाहता येईल. त्यामुळे भारतातून परतल्यानंतर आपल्या ऑस्कर ॲकॅडमीच्या बैठकीत मुंबईतील कार्यालयाबाबत आपण प्रस्ताव ठेवू असे बेली यांनी सांगितले.

आंतरराष्‍ट्रीय पातळीवर सिनेमांमध्ये भारतीय सिनेमांचे अस्तित्व अधिकाधिक दिसावे याबाबत आपण सुद्धा आग्रही असल्याचे बेली यांनी सांगितले. आज वर्षभरात भारतात 1800 सिनेमांची निर्मिती होते, ही संख्या हॉलिवूड सिनेमापेक्षा चार पटीने अधिक आहे. आज भारतीय सिनेमांची कथा, मांडणी आणि सिनेमा बनविण्यासाठी वापरण्यात येत असलेले तंत्रज्ञान यामुळे आपण प्रभावित आहोत. सध्या ॲकॅडमीच्या विविध विभागात 928 सदस्य वेगवेगळया 56 देशातील आहेत. येणाऱ्या काळात ऑस्कर ॲकॅडमीवर भारताचे विविध सिनेमा क्षेत्रातील दिग्गजांनी सहभाग द्यावा, जेणेकरुन भारतीय सिनेमा जगभर पोहोचण्यास मदत होईल अशी अपेक्षा बेली यांनी व्यक्त केली.

राज्य मराठी चित्रपट सोहळ्याला बेली दाम्पत्याची विशेष उपस्थिती : विनोद तावडे

56 वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा उद्या म्हणजेच 26 मे रोजी संध्याकाळी 6.30 वाजता वरळी येथील येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास ऑस्कर ॲकॅडमीचे अध्यक्ष जॉन बेली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

ऑस्करच्या स्थापनेपासून ऑस्करचे कोणतेही अध्यक्ष कधीच भारतात आले नव्हते. ऑस्करच्या स्थापनेपासून भारतामध्ये येणारे जॉन बेली हे पहिलेच अध्यक्ष आहेत. ऑस्कर अध्यक्षांना निमंत्रित करुन मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय गोष्टी त्यांच्या मार्फत जगभरातील सिनेसृष्टीत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे.

जॉन बेली हे गेली दोन वर्षे ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष आहेत. ऑस्कर अकादमीच्या सिनेमॅटोग्राफर विभागातून त्यांची ही निवड झाली आहे. कॅलिफोर्निया येथील स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट येथून त्यांनी पदवी प्राप्त केली. अमेरिकन सोसायटी ऑफ सिनेमॅटोग्राफर्स या जीवनगौरव पुरस्काराने बेली यांचा सन्मान झाला आहे. कॅरॉल लिटलटन या व्यवसायाने फिल्म एडिटर असून त्यांनी 30 हून अधिक चित्रपटांचे एडिटिंग केले आहे. हॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलूबर्ग यांच्या गाजलेल्या 'इट इ द एक्सट्रा टेरिस्टेरिअल' या चित्रपटाचा ही समावेश आहे.

राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे 56 वे वर्ष आहे. चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. याशिवाय व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार, विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, राज कपूर विशेष योगदान या सर्वोच्च पुरस्काराचे वितरण सुद्ध उद्या होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Nana Patekar Death Tanushree Dutta: 'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
Salman Khan On Karisma Kapoor: 'करिश्मा कपूरनं मला सोडलं आणि जाऊन लग्न केलं, माझं हृदय तुटलं...'; सलमान खाननं सर्वांना जाहीरपणे सांगून टाकलं, नेमकं काय घडलं?
'करिश्मा कपूरनं मला सोडलं आणि जाऊन लग्न केलं, माझं हृदय तुटलं...'; सलमान खाननं सर्वांना जाहीरपणे सांगून टाकलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Solapur Crime News: पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Embed widget