Poonam Pandey Passed Away : बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेच्या (Poonam Pandey) निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 32 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. सर्वायकल कॅन्सरने (Cervical cancer) तिचं निधन झालं आहे. पण पूनमच्या निधनाची बातमी तिच्या बहिणीने दिल्याचं समोर आलं आहे. दरम्यान कुटुंबियांचे फोन बंद आहेत. तर एक्स बॉयफ्रेंडने ती जिवंत असल्याचा दावा केला आहे.


बहिणीनेच दिलेली पूनमच्या निधनाची बातमी


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम पांडेच्या बहिणीने तिच्या निधनाची बातमी दिली आहे. पूनमच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या मॅनेजरने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर चाहते फेक न्यूज म्हणत कमेंट्स करत आहेत. पूनमच्या बहिणीचा आणि आईचा फोन बंद आहे. 


"पूनम जिंवतच आहे", एक्स बॉयफ्रेंडचा दावा


पूनमचा ड्रायव्हर अमर उजालासोबत बोलताना म्हणाला,"पूनम बांद्रा येथील तिच्या घरी होती आणि अचानक कुठेतरी निघून गेली. पुनमला ब्रेन ट्यूमर झाला आहे. 2 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी सात वाजता तिचं निधन झालं आहे". तर दुसरीकडे पूनमच्या एक्स बॉयफ्रेंडने दावा केला आहे की,"तिला काहीही झालं नसून ती जिवंत आहे".


पूनमने दोन दिवसांपूर्वीच केलेली पार्टी


पूनमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती अनेक अभिनेत्रींसोबत दिसत आहे. व्हिडीओवर अभिनेत्री रोज्लिन खानने कमेंट करत लिहिलं आहे,"सर्वायकल कॅन्सर झालेल्या व्यक्तीला बसताही येत नाही आणि ही पार्टी करत आहे. मला काहीतरी गडबड वाटते". 


पूनमचं निधन पब्लिसिटी स्टंट


पूनमच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर तिचं पार्थिव कुठे आहे? अंत्यसंस्कार कुठे होणार? निधनाबद्दल गोष्टी लपवल्या का जात आहेत? कुटुंबियांचे फोन का बंद आहेत?, अशा कमेंट्स करण्यात आल्या आहेत. पूनमचं निधन पब्लिसिटी स्टंट असल्याचं समोर आलं आहे. 


पूनमच्या वर्कफ्रंटबद्दल जाणून घ्या...


पूनम पांडेने बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'लॉकअप' कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. या कार्यक्रमानंतर ती चांगलीच अॅक्टिव्ह झाली. वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये ती स्पॉट झाली आहे. 'हनीमून स्वीट रूम नंबर 911' या सीरिजमध्ये ती शेवटची झळकली आहे. छोट्या पडद्यावरील 'आशिकी तुमसेही', 'नादानिया', फिअर फॅक्टर : खतरो के खिलाडी या शोमध्ये देखील ती झळकली होती.


संबंधित बातम्या


Poonam Pandey Death News : मोठी बातमी: मॉडेल पूनम पांडेचं निधन झाल्याचं वृत्त, इन्स्टाग्राम पोस्टमुळे खळबळ!