Poonam Pandey : लोकप्रिय अभिनेत्री, मॉडल पूनम पांडेचं (Poonam Pandey) सर्वायकल कॅन्सर कॅन्सरने निधन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. पूनमच्या निधानाने सर्वांनाच मोठा धक्का  बसला आहे. वयाच्या 32 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे.


बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचं (Poonam Pandey Death) निधन झाल्याचं वृत्त आहे. पूनम पांडेच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याबाबतची पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये म्हटलंय की, "आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली" पूनम पांडेला सर्वायकल कॅन्सर कॅन्सर (Cervical cancer) अर्थात गर्भाशयाचा कर्करोग होता असंही या पोस्टमध्ये लिहिलं आहे. मात्र कालच जाहीर झालेल्या देशाच्या अंतरिम अर्थसंकल्पात गर्भाशयाच्या कर्करोगापासून  बचावासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला होता. 9 ते 14 वर्षांच्या मुलींना मोफत लस देण्याची घोषणा केली. त्यामुळे पूनम पांडेंच्या निधनाच्या पोस्टवरुन नेटकऱ्यांमध्ये उलट-सुटल चर्चा सुरु आहेत.






पूनम पांडेची पोस्ट काय? (Poonam Pandey Post)


पूनम मांडेने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे,"आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली. संपर्कात आलेल्या सर्वांनाच तिने प्रेम दिलं आहे. आता यातून बाहेर पडायला आम्हाला थोडा वेळ द्यावा एवढी विनंती". पूनमच्या पोस्टवर हे अकाऊंट हॅक झालं आहे, ही पोस्ट खोटी ठरू देत अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


पूनम पांडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असायची. कोरोनाकाळात तिने बोल्ड अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 2011 साली क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान भारतीय संघ जिंकला तर नग्न होण्याची घोषणा करुन तिने खळबळ उडवून दिली होती.


कोण आहे पूनम पांडे (Who is Poonam Pandey)


पूनम पांडेने 2013 मध्ये नशा या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 'द जर्नी ऑफ कर्मा'  आणि 'मालिनी अँड कंपनी', 'दिल बोले हडिप्पा'  अशा अनेक सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवली. छोट्या पडद्यावरील 'आशिकी तुमसेही', 'नादानिया', फिअर फॅक्टर : खतरो के खिलाडी या शोमध्ये देखील ती झळकली होती.


दोन दिवसांपूर्वी शूटिंग करत होती पूनम पांडे : रोहित वर्मा


झिडायनर रोहित वर्मा एबीपी न्यूजसोबत बोलताना म्हणाले की,"पूनम पांडे दोन दिवसांपूर्वी शूटिंग करत होती. त्यावेळी तिची प्रकृती खालावली आहे, असं कुठेच वाटलं नाही. तिला कॅन्सर झाला आहे याचा अंदाजही आला नाही. आता कानपुरमध्ये तिचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे". 




संबंधित बातम्या


Poonam Pandey :बोल्ड सीन, बोल्ड स्टेटमेंट ते अजब दावे, सतत चर्चेतील पूनम पांडे


Cervical Cancer Symptoms : महिलांमध्ये आढळणारा सर्वायकल कॅन्सर नेमका कशामुळे होतो? वाचा लक्षणं आणि उपचार