Seema Haider on India Pakistan : पाकिस्तानातून भारतात पळून आलेली सीमा हैदर (Seema Haider) पाचव्यांदा आई होणार आहे. अशातच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिने भारत आणि पाकिस्तानमधील समानतेबद्दल भाष्य केलं आहे. दोन्हीकडे गोष्टी समान आहेत पण नावे वेगळी आहे, असं वक्तव्य तिने केलं आहे.


पाकिस्तानी सीमा हैदर आणि भारतीय सचिन यांच्या लव्हस्टोरीने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाकिस्तानी सीमा भारतात स्टार झाली आहे. दरम्यान तिच्या एका व्हिडीओने मात्र नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये सीमा भारत (India) आणि पाकिस्तानमधील (Pakistan) समानता आणि असमानतेबद्दल भाष्य करताना दिसत आहे. 


सीमा म्हणते आहे,"भारत आणि पाकिस्तानमध्ये मिळणाऱ्या गोष्टी समान आहेत. फक्त नावे वेगळी आहेत. भारतातील अनेक गोष्टी सचिन मला समजावून सांगतो. पण त्या समजून घ्यायला मला थोडा वेळ लागतो". सीमाच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. भारत आणि पाकिस्तानात मिलाप घडवण्याचा सीमा हैदरचा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.






सीमा हैदर कोण आहे? (Who is Seema Haider)


प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर 2023 पासून चर्चेत आहे. सीमा 13 मे 2023 रोजी तिच्या चार मुलांसह कराचीहून नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली. सध्या ती पती सचिन मीनासह नोएडामध्ये राहत आहे. सीमा आणि सचिन यांची अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या प्रेमकथेवर आधारित 'कराची टू नोएडा' (Karachi to Noida) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


सीमा हैदर पाचव्यांदा आई होणार? (Seema Haider Pregnant)


सीमा हैदर 2024 मध्ये गुडन्यूज देणार असल्याची चर्चा होती. सध्या ती पती सचिन मीनासोबत नोएडामध्ये राहत आहे. आई होणार असल्याबद्दल बोलताना सीमा म्हणाली होती,"2024 मध्ये मी एक आनंदाची बातमी देणार आहे. मिठाईदेखील देईल. 2024 मध्ये सचिनचा वाढदिवस असून यावेळी आणखी कोणाचा जन्म झाला तर नक्कीच आनंद आहे". सीमा सध्या भारतात हिंदू संस्कृतीचं पालन करताना दिसून येते.


संबंधित बातम्या


Seema Haider Pregnant : पाकिस्तानी सीमा हैदर पाचव्यांदा आई होणार? म्हणाली,"2024 मध्ये गुडन्यूज देणार"