Poonam Pandey : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हिचे सर्वायकल कॅन्सरमुळे सर्वायकल (Cervical Cancer) मुळे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे. तिच्या अभिनयापेक्षा इतर वादग्रस्त गोष्टींमुळे ती नेहमीच चर्चेत असायची. पूनम पांडेचा जन्म 11 मार्च 1991 मध्ये दिल्लीत झाला होता. अतिशय साधारण कुटुंबातून तिचा प्रवास सुरु झाला होता. त्यानंतर तिचे शिक्षण दिल्लीत (Delhi) झाले होते. वयाच्या 18 व्या वर्षांपासून तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. जाणून घेऊयात पूनमच्या प्रवासाबद्दल...
चाहत्यांकडून इन्स्टाग्राम आयडी हॅक झाल्याचा दावा
अभिनेत्री पूनम पांडे हिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचे कर्करोगामुळे निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, काही चाहत्यांनी याबाबत काही दावे केले आहेत. पूनमचे अकाऊंट हॅक झाले असल्याचे दावेही सोशल मीडियावर चाहते करत आहेत.
वादग्रस्त वक्तव्ये करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न
सुरुवातीला काही लोकांना मला नेहमी वादात राहण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे मी नेहमी वादात राहण्याचा प्रयत्न करत होते, असा खुलासा अभिनेत्री पूनम पांडेने केला होता. छोट्या पडद्यांपासून मोठ्या पडद्यापर्यंत काम करत तिने वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला यश आले नाही. मात्र, वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहत होती.
'नशा' या सिनेमातून कारकिर्दीला सुरुवात
अभिनेत्री पूनम पांडेने 2013 मध्ये 'नशा' या सिनेमातून तिने कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर 'द जर्नी ऑफ कर्मा' आणि 'मालिनी अँड कंपनी', 'दिल बोले हडिप्पा' या सिनेमामध्येही तिने काम केले होते. तिने छोट्या पडद्यावर 'आशिकी तुमसेही', 'नादानिया', फिअर फॅक्टर : खतरो के खिलाडी या शोमध्ये देखील ती झळकली होती.
टीम इंडिया वर्ल्डकप जिंकली तर...
पूनम पांडे 2011 च्या दरम्यान सर्वांत जास्त चर्चेत होती. त्यावर्षात भारतात विश्वचषक देखील खेळवण्यात आला होता. जर टीम इंडियाने विश्वचषक जिंकला तर मी काही खास फोटो शेअर करेल, असा दावाही पूनम पांडेने केला होता.
सॅम बॉम्बेसोबत विवाह आणि गंभीर आरोप
पूनम पांडेने 2020 मध्ये बऱ्याच काळापासून बॉयफ्रेंड असलेल्या सॅम बॉम्बेसोबत विवाह केला होता. दरम्यान तिने लग्नाच्या 12 दिवसानंतर सॅम बॉम्बेवर गंभीर आरोप केले होते. त्यामुले गोवा पोलिसांना त्याला अटक केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या