Ponniyin Selvan:  बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya RaiBachchan) सध्या तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन'च्या (Ponniyin Selvan) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मणिरत्नम (Mani ratnam) दिग्दर्शित हा भव्य चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ऐश्वर्या राय दक्षिणेत या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसते आहे. मात्रे, प्रमोशनसाठी तिने 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) जाणे टाळले आहे. ‘द कपिल शर्मा शो’च्या नवीन भागाचा ट्रेलर नुकताच प्रसारित झाला आणि त्यात ऐश्वर्या राय बच्चन वगळता ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट 1’ चित्रपटातील सर्व कलाकार दिसले. मात्र, यावेळी ऐश्वर्या राय न दिसल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. अनेक लोक वेगवेगळे तर्क लावत आहेत.


नवीन चित्रपट आला की, त्या चित्रपटाचे कलाकार त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये जातात. ऐश्वर्याने यापूर्वी तिच्या ‘जज्बा’ आणि ‘ए दिल है मुश्कील’ या चित्रपटांच्या प्रमोशनवेळी या शोमध्ये हजेरी लावली होती. मात्र, ती नव्या चित्रपटाच्या टीमसोबत दिसलेली नाही.



चाहते म्हणतायत सलमान कारणीभूत...


‘पोन्नियिन सेल्वन पार्ट 1’ (Ponniyin Selvan) या चित्रपटात ऐश्वर्या राय-बच्चन एका राणीच्या भूमिकेत दिसणार आहे. ऐश्वर्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते वाट पाहत आहेत. यासोबतच ती चित्रपटाच्या टीमसोबत कपिल शर्माच्या शोमध्ये येईल, असे ऐश्वर्याच्या चाहत्यांना वाटले. मात्र, यावेळी  ती शोमध्ये पोहोचली नाही, याचे कारण सलमान खान असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. ऐश्वर्या राय बच्चनचा ‘एक्स बॉयफ्रेंड’ बॉलिवूड अभिनेता सलमान खान 'द कपिल शर्मा शो'चा निर्माता आहे. सलमानच्या शोमध्ये जायचे नसावे, म्हणूनच ऐश्वर्याने या मंचावर चित्रपटाचे प्रमोशन करणे टाळले असावे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. मात्र, चित्रपटाच्या टीमने ऐश्वर्या राय न येण्यामागचं कारण सांगितलेलं नाही.


उद्या रिलीज होणार चित्रपट!


दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक मणिरत्नम 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. 'पोन्नियिन सेल्वन' हा चित्रपट दोन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट 1’ हा 30 सप्टेंबरला म्हणजेच उद्या रिलीज होणार आहे. या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. विशेषत: त्याच्या बजेटमुळे तो खूप चर्चेत आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल 500 कोटी रुपये खर्च झाल्याचे बोलले जात आहे. चोल राजवटीवर आधारित हा चित्रपट लोकांना किती पसंत पडेल हे लवकरच कळणार आहे.


संबंधित बातम्या


Ponniyin Selvan Teaser : 'पोन्नियिन सेल्वन'चा टीझर आऊट; ऐश्वर्या रायचा राजेशाही लूक


Ponniyin Selvan-1 : ऐश्वर्याच्या 'पोन्नियन सेलवन' ची रिलीज डेट जाहीर ; फर्स्ट लूक चर्चेत