Ponniyin Selvan : 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या बहुचर्चित सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून आता प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा आजवरचा सर्वात महागडा सिनेमा असणार आहे. 


'पोन्नियिन सेल्वन'चा दिमाखदार टीझर


'पोन्नियिन सेल्वन' या सिनेमाचा टीझर दिमाखदार आहे. टीझरमध्ये विक्रम, किच्चा सुदीप आणि जयम रवी दिसून येत आहेत. टीझरमध्ये मोठ-मोठे जहाजं, हत्ती-घोडे आणि आलिशान बंगले दिसत आहेत. 'पोन्नियिन सेल्वन' हा महागडा सिनेमा असणार याचा टीझरवरून अंदाज येत आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 




दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक मणिरत्नम 'पोन्नियिन सेल्वन' या सिनेमाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये ऐश्वर्या रायचा राजेशाही लूक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पाच भाषांमध्ये टीझर रिलीज करण्यात आला आहे. तर सिनेमादेखील हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. 


30 सप्टेंबरला सिनेमा होणार रिलीज


'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा दोन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. हा सिनेमा कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित असणार आहे. ही कादंबरी  1995 साली काल्कि यांनी लिहिली आहे. लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Ponniyin Selvan-1 : ऐश्वर्याच्या 'पोन्नियन सेलवन' ची रिलीज डेट जाहीर ; फर्स्ट लूक चर्चेत


Vikram Hospitalized : दाक्षिणात्य अभिनेता विक्रमची प्रकृती खालावली; चैन्नईतील रुग्णालयात दाखल