Ponniyin Selvan I: दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांचा पोन्नियिन सेल्वन: I (Ponniyin Selvan: I) हा चित्रपट 2022 या वर्षाचा सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. ब्रह्मास्त्र आणि विक्रम या चित्रपटांना पोन्नियिन सेल्वन: I  या चित्रपटानं कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. 'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा दोन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाचा दुसरा भाग हा नऊ महिन्यांनी रिलीज केला जाणार आहे, असं म्हटलं जात आहे.  या चित्रपटात विक्रम, ऐश्वर्या राय (Aishwarya Rai), जयम रवी, कार्थी, तृषा कृष्णन आणि ऐश्वर्या लक्ष्मी यांनी प्रमुख भूमिका साकरली आहे.


पोन्नियिन सेल्वन: I नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली?
एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, पोन्नियिन सेल्वन या चित्रपटानं 17 ऑक्टोबर पर्यंत जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवळपास 455 कोटींची कमाई केली आहे. तर अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटानं  जगभरातील बॉक्स ऑफिसवर 431 कोटींची कमाई केली आणि कमल हसन यांच्या विक्रम या चित्रपटानं 443 कोटींची कमाई केली. 


 चित्रपटांचे बजेट 500 कोटी


पोन्नियिन सेल्वन हा चित्रपट दोन भागात रिलीज होणार आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.  लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचा साउंडट्रॅक ए आर रहमानने संगीतबद्ध केला आहे. Lyca Productions द्वारे निर्मित, हा चित्रपट IMAX थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला तमिळ चित्रपट असेल.


पोन्नियिन सेल्वन: I या चित्रपटाचा साउंडट्रॅक ए आर रहमानने संगीतबद्ध केला आहे. 30 सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला. 500 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.  लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. ऐश्वर्या राय बच्चन पोन्नियिन सेल्वनमध्ये राणी नंदिनीची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता चियान विक्रम शोभिता धूलिपाला आणि जयम रवी हे कलाकार देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 19 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!