Entertainment News Live Updates 19 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 19 Oct 2022 06:05 PM
Alia Bhatt: अशी झाली आलिया बॉलिवूडची 'डार्लिंग'; 10 वर्षांपूर्वी 'स्टुडंट' होऊन केली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Alia Bhatt: बॉलिवूडमधील  चुलबुली अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) आज बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन दहा वर्ष झाली. या दहा वर्षात आलियानं चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारुन नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली. कधी जनरल नॉलेजमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे आलियाला अनेक वेळा ट्रोलर्सनं ट्रोल केलं. पण या ट्रोलर्सकडे लक्ष न देता आलियानं बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली. 2012 मध्ये रिलीज झालेल्या स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटामधून आलियानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहर केलं. करण हाच आलियाचा बॉलिवूडमधील 'गॉड फादर' आहे, असंही अनेकांचे मत आहे. आज बॉलिवूडमध्ये आलियानं दहा वर्ष पूर्ण केली आहेत. याच निमित्तानं जाणून घेऊयात आलियाचे प्रेक्षकांची पसंती मिळालेले काही चित्रपट...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Adipurush: 'आदिपुरुष' चित्रपट निर्माता ओम राऊतला भूषण कुमार यांच्याकडून खास गिफ्ट; किंमत ऐकून व्हाल अवाक्!

Adipurush:  प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) हा सध्या त्याच्या आदिपुरुष (Adipurush) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये वापरण्यात आलेल्या VFX मुळे अनेकांनी या ट्रेलरला ट्रोल केलं. या चित्रपटात सैफ अली खान (Saif Ali Khan), प्रभास (Prabhas) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांनी प्रमुख भूमिका साकरली आहे. या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार (Bhushan Kumar) यांनी ओम राऊतला लग्झरी काल गिफ्ट केली आहे. या कारची किंमत जाणून घेऊयात...


भूषण कुमार यांनी ओम राऊतला दिली फेरारी
भूषण कुमार यांनी ओम राऊतला भेट म्हणून दिलेली फेरारी ही जवळपास 4.02 कोटी रुपयांची आहे. ही लाल रंगाची  Ferrari F8 Tributo भूषण कुमार यांच्या नावानं रजिस्टर्ड आहे. त्यामुळे भूषण यांनी त्यांच्या कलेक्शनमधील कार ओमला दिली आहे, असं म्हटलं जात आहे.  

हॉरर अन् कॉमेडीचा तडका! वरुण धवन-क्रिती सेननच्या ‘भेडिया’चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेननची (Kriti Sanon) जोडी पहिल्यांदाच 'भेडिया' (Bhediya) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला, ज्याने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. त्यानंतर, या चित्रपटातील वरुण धवन आणि क्रिती सेननचे पोस्टर्सही रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये वरुण धवन ‘भेडिया’ अर्थात लांडग्याच्या खतरनाक अवतारात दिसला, तर 'मिमी' फेम अभिनेत्री क्रिती सेननच्या पूर्णपणे वेगळ्या लूकनेही चाहत्यांना खूप प्रभावित केले होते. आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे.


Varsha Dandale: 'कोण आहेत ही माणसं? यांना कामधंदे नाहीत का?'; अफवा पसरवणाऱ्यांचे वर्षा दांदळे यांनी टोचले कान

Varsha Dandale: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे (Varsha Dandale) या त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. वेगवेगळ्या मालिकांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. 2021 मध्ये वर्षा यांचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांना दुखापत झाली. पण काही काळ ब्रेक घेतल्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी त्या पुन्हा सज्ज झाल्या. सध्या त्या नवा गडी नवं राज्य या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या मालिकेत त्या राघवच्या आईची भूमिका साकारत आहेत. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट व्हायरल झाली होती. 'वर्षा दांदळे या अंथरूणाला खिळून आहेत' अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. या अफवा पसरवणाऱ्यांना आता वर्षा यांनी चांगलंच सुनावलं आहे. 



Varsha Dandale: 'कोण आहेत ही माणसं? यांना कामधंदे नाहीत का?'; अफवा पसरवणाऱ्यांचे वर्षा दांदळे यांनी टोचले कान

Varsha Dandale: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे (Varsha Dandale) या त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. वेगवेगळ्या मालिकांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. 2021 मध्ये वर्षा यांचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांना दुखापत झाली. पण काही काळ ब्रेक घेतल्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी त्या पुन्हा सज्ज झाल्या. सध्या त्या नवा गडी नवं राज्य या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या मालिकेत त्या राघवच्या आईची भूमिका साकारत आहेत. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट व्हायरल झाली होती. 'वर्षा दांदळे या अंथरूणाला खिळून आहेत' अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. या अफवा पसरवणाऱ्यांना आता वर्षा यांनी चांगलंच सुनावलं आहे. 



Vaishali Thakkar : ‘राहुल म्हणजे डरमधला शाहरुख खान, माझा पिच्छा सोडणार नाही!’; वैशालीच्या आईने सांगितली लेकीची आपबिती!

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) हिने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या लाडक्या अभिनेत्रीच्या जाण्याने तिचे चाहतेही दु:खी आहेत. तिच्या मृत्यूनंतर अनेक गुपिते उघड होत आहेत. तिचा माजी प्रियकर राहुल नवलानीच्या छळाला कंटाळून वैशालीने हे पाऊल उचलल्याचे वैशालीच्या सुसाईड नोटवरून उघड झाले आहे. वैशाली ठक्कर प्रकरणानंतर इंदूर पोलीसही सक्रिय झाले आहेत. वैशालीचा प्रियकर राहुल नवलानी, त्याची पत्नी दिशा आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलिस लुकआउट नोटीस जारी करणार आहेत.


 





Bigg Boss 16 : बिग बॉस16चं घर म्हणजे वाद अन् कुस्तीचा आखाडा; अर्चना-मान्यामध्ये पुन्हा जुंपणार!

‘बिग बॉस 16’चा (Bigg Boss 16) 18वा भाग भरपूर ड्रामा आणि गदारोळाने भरलेला होता. एकीकडे घरामध्ये प्रेम फुलतंय, त्याचबरोबर घरातील काही सदस्यांमध्ये तर रोज भांडणे होत असतात. नव्या एपिसोडमध्येही चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे शोच्या प्रोमोमध्ये स्पष्ट झाले आहे. 17व्या दिवसाच्या सुरूवातीला घराचा नवा कॅप्टन शिव प्रियांकाला भांडी धुण्याची ड्युटी देतो. यादरम्यान प्रियंका म्हणते की, हे तिचे काम नाही, ती फक्त शिवच्या सांगण्यावरून हे काम करत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून प्रियांका आणि निमरीतमध्ये वाद सुरू झाला.


 



Ponniyin Selvan I: 'ब्रह्मास्त्र' अन् 'विक्रम'ही पिछाडीवर; यंदाच्या वर्षी कमाईच्या बाबतीत 'पोन्नियिन सेल्वन'ने मारली बाजी!

Ponniyin Selvan I: दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांचा पोन्नियिन सेल्वन: I (Ponniyin Selvan: I) हा चित्रपट 2022 या वर्षाचा सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. ब्रह्मास्त्र आणि विक्रम या चित्रपटांना पोन्नियिन सेल्वन: I  या चित्रपटानं कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. 'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा दोन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाचा दुसरा भाग हा नऊ महिन्यांनी रिलीज केला जाणार आहे, असं म्हटलं जात आहे.  या चित्रपटात विक्रम, ऐश्वर्या राय (Aishwarya Rai), जयम रवी, कार्थी, तृषा कृष्णन आणि ऐश्वर्या लक्ष्मी यांनी प्रमुख भूमिका साकरली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Urfi Javed: जया बच्चन यांच्यावर भडकली उर्फी; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'यांच्यासारखं होऊ नका'

Urfi Javed: अभिनेत्री  जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी नुकत्याच मुंबईमध्ये पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती. या फॅशन शोमधील जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन या काही फोटोग्राफर्सवर भडकलेल्या दिसत आहेत. आता जया बच्चन (Urfi Javed) यांचा हा व्हायरल व्हिडीओ शेअर करुन अभिनेत्री उर्फी जावेदनं जया यांच्यावर टीका केली आहे. 



Rhea Chakraborty : तुरुंगातून बाहेर पडताना रिया चक्रवर्तीने वाटली मिठाई, कैद्यांसोबत धरला होता ठेका!

तुरुंगातील शेवटच्या दिवशी रियाने बॅरेकमधील सर्व कैद्यांसाठी मिठाई खरेदी केली होती. सर्वजण तिचा निरोप घेण्यासाठी खाली आले होते. त्यानंतर एका कैद्याने तिच्यासोबत डान्स करण्याची विनंती केली होती आणि तिने ही विनंती नाकारली नाही आणि अभिनेत्रीनेही सर्व कैद्यांसह डान्स देखील केला, असं सुधा म्हणाल्या. भीमा कोरेगाव प्रकरणी सुधा भारद्वाज तुरुंगात होत्या. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांची सुटका झाली होती.


 





‘कांतारा’चची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरूच! पार केला 150 कोटींचा टप्पा!

यंदाचे हे वर्ष दाक्षिणात्य चित्रपटांसाठी खूप धमाकेदार ठरले आहे. 'KGF 2' पासून ते एसएस राजामौलींच्या 'RRR' आणि मणिरत्नमच्या 'Ponniyin Selvan-1' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटांना दक्षिणेतील प्रेक्षकांचे तसेच, हिंदी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले असून, आता या यादीत आणखी एका चित्रपटाचा समावेश झाला आहे. KGF आणि KGF 2 नंतर, Hombale Films चा दुसरा कन्नड चित्रपट ‘कांतारा’ने (Kantara) बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी केली आहे.


 


Happy Birthday Sunny Deol : अभिनेता सनी देओल याचा आज वाढदिवस!

अॅक्शन स्टार सनी देओलचा (Sunny Deol) आज 65 वा वाढदिवस आहे. सशक्त अॅक्शन सीक्वेन्स आणि जबरदस्त संवादांसाठी ओळखला जाणारा सनी सध्या राजकारणी आणि अभिनेता अशा दोन्ही भूमिका करत आहे. सनी देओलला 90च्या दशकात लोकांच्या मनामध्ये जागा मिळाली होती. जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केलेल्या सनीला लहानपणापासूनच वडील सुपरस्टार धर्मेंद्र यांच्यासारखे यशस्वी अभिनेता व्हायचे होते आणि वडिलांचीही तीच इच्छा होती.


 





Gandhar Gaurav Puraskar 2022 : "मराठीतील सुपरस्टार" सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बालदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार सोहळा 14  नोव्हेंबरला गडकरी रंगायतन येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांनी मंगळवारी गडकरी रंगायतन येथे दिली. सचिन पिळगांवकर हे कला क्षेत्रातील सचिन तेंडुलकर असल्याचे कौतुकोदगार त्यांनी काढले. 


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.         


"मराठीतील सुपरस्टार" सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर


मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बालदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार सोहळा 14  नोव्हेंबरला गडकरी रंगायतन येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांनी मंगळवारी गडकरी रंगायतन येथे दिली. सचिन पिळगांवकर हे कला क्षेत्रातील सचिन तेंडुलकर असल्याचे कौतुकोदगार त्यांनी काढले.


प्राजक्ता गायकवाडचा नवा चित्रपट; "काटा किर्रर्र" मधून आली प्रेक्षकांच्या भेटीस


स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमधून आपल्या अभिनयाची छाप सोडत तमाम मराठी भाषिक प्रेक्षकांच्या मनात घर करणारी, अभिनयाने परिपूर्ण अशी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) "काटा किर्रर्र" या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.  प्रेम करण्यासाठी कोणत्याच गोष्टींच्या बंधनाची गरज नसते, आणि जिथे कोणत्याही प्रकारचे बंधने येतात तिथे प्रेम कधीच होत नाही. काटा किर्रर्र चित्रपटामध्ये अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं  मोहिनी ही भूमिका साकरली आहे. आपल्या भावावर म्हणजेच चित्रपटामधील मुख्य कलाकार कांतावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्याच्या पाठीशी उभी राहून त्याच्या साठी झगडणारी अशी बहीण आपल्याला चित्रपटामध्ये बघायला मिळेल.


रणवीर सिंहनं चालवली विमा संपलेली कार? यशराज फिल्म्सनं दिलं नेटकऱ्यांच्या प्रश्नाचं उत्तर


“काल एका ट्विटर युझरनं रणवीर त्याची 3.9 कोटी रुपयांची अॅस्टन मार्टिन विमा संपला असूनही चालवतो, असा आरोप केला. मुंबई विमानतळावर जेव्हा रणवीर आला तेव्हा  तो त्याच्या अ‍ॅस्टन मार्टिनमध्ये बसला, जी तिथे आधीच होती. एका वापरकर्त्याने दावा केला की त्याच्याकडे या वाहनासाठी वैध विमा पॉलिसी नाही. वस्तुस्थिती तपासल्यावर आम्हाला कळाले की, रणवीरकडे असणाऱ्या या गाडीचा विमा हा वैध आहे. सोशल मीडियाच्या या जगात अनेक खोट्या बातम्या पसरत असतात. पण फॅक्ट चेक न करता अशा बातम्या पसरवल्या जात आहे. ” अशी माहिती यशराज फिल्म्सनं दिली.


बीटीएस’ चाहत्यांनो ऐकलंत का? प्रसिद्ध ‘बॉय बँड’ आता गिटारऐवजी हातात घेणार बंदूका; आता देशासाठी लढणार!


देशात आणि जगभरात क्वचितच असा कोणी संगीतप्रेमी असेल, ज्याला 'बीटीएस' (BTS) हे नाव माहीत नसेल. दक्षिण कोरियन बँड ‘बीटीएस’चे (BTS) चाहते जगभरात विखुरलेले आहेत. या बँडचे प्रत्येक गाणे चाहत्यांना खूप आवडते आणि त्यांची गाणी अगदी सहज टॉप ट्रेंडमध्ये स्थान मिळवतात. मात्र, आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता बीटीएस बँडचे हे सगळे कलाकार हातात गिटारऐवजी बंदूक घेणार आहेत. अर्थात, आपण आपल्या देशाचे काहीतरी देणे लागतो हाच भाव मनात ठेवून हे सगळे कलाकार आता सैन्यात भरती होणार आहेत.


'द काश्मीर फाइल्स 2' पुढल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला; विवेक अग्निहोत्रीची माहिती


'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर प्रेक्षक आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. पुढल्या वर्षात या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाची निर्मिती 15 कोटींमध्ये करण्यात आली असली तरी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. रेकॉर्डब्रेक कमाई करत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 340 कोटींचा टप्पा पार केला. नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटनांचे वर्णन करणारा हा सिनेमा आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.