Kantara : यंदाचे हे वर्ष दाक्षिणात्य चित्रपटांसाठी खूप धमाकेदार ठरले आहे. 'KGF 2' पासून ते एसएस राजामौलींच्या 'RRR' आणि मणिरत्नमच्या 'Ponniyin Selvan-1' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटांना दक्षिणेतील प्रेक्षकांचे तसेच, हिंदी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले असून, आता या यादीत आणखी एका चित्रपटाचा समावेश झाला आहे. KGF आणि KGF 2 नंतर, Hombale Films चा दुसरा कन्नड चित्रपट ‘कांतारा’ने (Kantara) बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी केली आहे.
कन्नडसोबतच हा चित्रपट हिंदी आणि तेलुगु भाषांमध्ये देखील प्रदर्शित झाला. या व्हर्जनमध्येही 'कांतारा' ला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आणि चित्रपटाने जगभरात जबरदस्त कमाई केली. कांताराचे वादळ जगभर सुरू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. 100 कोटींनंतर अवघ्या 18 दिवसांत 150 कोटींची कमाई करत ‘कांतारा’ने नवा विक्रम रचला आहे. चित्रपटाची धमाकेदार कमाई पाहून, ट्रेंड तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, कांतारा लवकरच 200 कोटी क्लबमध्ये सामील होऊ शकेल.
तिसऱ्या आठवड्यातही तुफान कमाई
30 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा’ चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही यशस्वी घौडदौड करत आहे. आधी हा चित्रपट फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता, पण नंतर चित्रपटाला मिळालेले अफाट यश पाहून निर्मात्यांनी तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्येही त्याचे डबिंग केले. इतर भाषांमध्ये रिलीज झाल्यानंतर ‘कांतारा’च्या कमाईत वाढ झाली आहे. चित्रपटाची कन्नड आवृत्ती ब्लॉकबस्टर ठरली आणि आता इतर भाषांमध्येही या चित्रपटाने आपली चुणूक दाखवली आहे.
16 कोटींच्या बजेटमध्ये बनला चित्रपट!
बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने कन्नड भाषेत सर्वाधिक कमाई केली आहे. चित्रपटाचे यश पाहून निर्मात्यांनी हा चित्रपट इतर भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. या चित्रपटाचे हिंदी, तमिळ आणि तेलुगू व्हर्जन देखील थिएटरमध्ये रिलीज झाले आहे. तर, IMDbवरही चित्रपटाने चांगले रेटिंग मिळवले आहे. कन्नड भाषेतील चित्रपट ‘कांतारा’ सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट IMDb वर सर्वोत्तम रेटिंग मिळवणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने IMDb वर 9.5 रेटिंग मिळवून विक्रम रचला आहे. यापूर्वी हा विक्रम ‘KGF 2’च्या नावावर होता. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा’ हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Kantara Movie Review : मानव-निसर्गाच्या संघर्षावर गुंफलेला 'कांतारा'