Rhea Chakraborty : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात, त्याची मैत्रीण-अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला ड्रग्जच्या अँगलमुळे अटक करण्यात आली होती. ती काही दिवस तुरुंगातही होती. मात्र, काही दिवसांनी ती बाहेर आली आणि आता तिचे आयुष्य व्यवस्थित जगत आहे. दरम्यान, मानवाधिकार वकील सुधा भारद्वाज यांनी अभिनेत्रीबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. सुधा यांनी सांगितले की, त्यांनी रियाला तुरुंगात पाहिले होते. त्या म्हणाली की, अभिनेत्री असण्याचा रुबाब तिने तिथे कोणालाही दाखवला नाही. उलट ती सगळ्यांशी खूप चांगली बोलायची आणि शेवटच्या दिवशी तिने जेलमधील सगळ्यांसाठी परफॉर्मन्सही केला होता.


अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने कधीच तिच्या तुरुंगातील दिवसांबद्दल काहीही वक्तव्य केलेलं नाही. पण तिच्यासोबत तुरुंगात असलेल्या मानवाधिकार वकील आणि ट्रेड युनियनिस्ट सुधा भारद्वाज यांनी रियाच्या तिथल्या सगळ्यांशी असलेल्या वर्तवणूकीबद्दल सांगितले आहे.


शेवटच्या दिवशी रिया...


भीमा कोरेगाव प्रकरणी सुधा भारद्वाज तुरुंगात होत्या. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांची सुटका झाली होती. सुधा या रिया चक्रवर्तीच्या तुरुंगातील दिवसांबद्दल एका वेबसाईटशी बोलल्या. सुधा भारद्वाज म्हणाल्या, 'मीडियामध्ये सुशांत सिंह राजपूतची चर्चा सुरू होती, तिथे लोक त्याला वेडा असल्याचे म्हणायचे. तेव्हा रियाला बळीचा बकरा बनवला जात आहे, असे आम्ही म्हणायचो. रियाला मुख्य बॅरेकमध्ये आणले नाही, याचा मला आनंद झाला. तिला विशेष बॅरेकमध्ये ठेवण्यात आले होते. मला वाटते की, तिला यासाठी तिथे ठेवण्यात आले होते, जेणेकरून ती टीव्ही पाहू नये, कारण लोक तो टीव्ही चालू ठेवतील आणि तिला सतत तेच तेच ऐकून त्रास होईल.’


तुरुंगातील शेवटच्या दिवशी रियाने बॅरेकमधील सर्व कैद्यांसाठी मिठाई खरेदी केली होती. सर्वजण तिचा निरोप घेण्यासाठी खाली आले होते. त्यानंतर एका कैद्याने तिच्यासोबत डान्स करण्याची विनंती केली होती आणि तिने ही विनंती नाकारली नाही आणि अभिनेत्रीनेही सर्व कैद्यांसह डान्स देखील केला, असं सुधा म्हणाल्या.


रियाने भोगला 28 दिवसांचा तुरुंगवास


जून 2020मध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती. त्या काळात अभिनेत्री रिया चक्रवर्ती या अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. सुशांतच्या मृत्यूनंतर रियावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि अभिनेत्याला ड्रग्स दिल्याच्या आरोपाखाली तिला सुमारे 28 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. रियाला मुंबईतील भायखळा कारागृहात ठेवण्यात आले होते.


हेही वाचा :


PHOTO: रिया चक्रवर्तीची किलर स्टाईल; शॉर्ट ड्रेस घालून केलं नवं फोटोशूट!