एक्स्प्लोर

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट 'या' दिवशी प्रदर्शित होणार

देशभरात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर अधारित 'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट रखडला होता. परंतु आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई : देशभरात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर अधारित 'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट रखडला होता. परंतु आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. शुक्रवारी चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. मोदींचा बायोपिक 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु 11 एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली. हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित केला जाऊ नये, यासाठी काँग्रेसकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा निर्णय निवडणूक आयोगावर सोपवला. निवडणूक आयोगाने हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करण्यास बंदी घातली. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी केली जाणार असल्यामुळे 23 मे नंतर हा चित्रपट प्रदर्शित करता येऊ शकतो. त्यामुळे हा चित्रपट 24 मे रोजी प्रदर्शित कऱण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे. टीव्ही अभिनेत्री बरखा बिष्ट जशोदाबेन, तर अभिनेते मनोज जोशी अमित शाह यांच्या भूमिकेत दिसतील. याशिवाय बमन इराणी, ​झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय, प्रशांत नारायणन यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत असतील. सरबजीत, मेरी कोम यांसारख्या चरित्रपटांचे दिग्दर्शक ओमंग कुमार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून संदीप सिंग या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IIFA Awards 2026 Bollywood: 'धुरंधर'च्या वादळात दिग्गजही झुकले, रणवीर सिंह बेस्ट अ‍ॅक्टर, विक्की कौशलचा 'छावा'ही दमदार; IIFA Awards मध्ये कुणाकुणाला बहुमान?
'धुरंधर'च्या वादळात दिग्गजही झुकले, रणवीर सिंह बेस्ट अ‍ॅक्टर, विक्की कौशलचा 'छावा'ही दमदार; IIFA Awards मध्ये कुणाकुणाला बहुमान?
Roja Actress Vatsala Rajagopal Passes Away: बॉलिवूडवर दुःखाचा डोंगर, 'रोजा' फेम अभिनेत्री वत्सला राजगोपाल यांचं निधन
बॉलिवूडवर दुःखाचा डोंगर, 'रोजा' फेम अभिनेत्री वत्सला राजगोपाल यांचं निधन
Shraddha Kapoor Eetha Trailer Release: 'महाराष्ट्राची शान, लावणीचा अभिमान... विठाबाई...'; अंगावर शहारे आणणारा श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर, दमदार डायलॉग्स अन् म्युझिक, Trailer
'महाराष्ट्राची शान, लावणीचा अभिमान... विठाबाई...'; अंगावर शहारे आणणारा श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर, दमदार डायलॉग्स अन् म्युझिक, Trailer
Rakul Preet Singh On Surpanakha Character Ramayana Movie: 'शूर्पणखाबद्दल अनेक गैरसमज... तिच्यामुळेच युद्धाची सुरुवात झाली...'; 'रामायण' सिनेमातल्या भूमिकेवर रकुल प्रीत सिंह थेट वक्तव्य, काय म्हणाली?
'शूर्पणखाबद्दल अनेक गैरसमज...'; 'रामायण' सिनेमातल्या भूमिकेवर रकुल प्रीत सिंह थेट वक्तव्य, काय म्हणाली?

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Embed widget