PM Narendra Modi Biopic OTT Release: आपल्या कर्तृत्वाने देशभर आणि जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक चित्रपट लवकरच म्हणजे 23 सप्टेंबरला एमएक्स प्लेयर ( Mx Player) या ओटोटी प्लॅटफॉर् वर आपल्याला पाहायला मिळेल.


अभिनेता विवेक ओबेरॉय या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाला की, "देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मी खूप आदर करतो, आणि मी स्वतः ला खूप भाग्यवान समजतो की या सिनेमाच्या माध्यमातून मला त्यांनी जगलेले जीवन लोकांसमोर आणता आलं."


विवेकनं पुढं असंही म्हंटल की, "गुजरातमधील एका छोट्या जिल्ह्यातून सुरु झालेला नरेंद्र मोदी यांचा प्रवास देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत कसा पोहोचला हे या बायोपिकमधून दाखवण्यात आलं आहे. त्यांची ही भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे. ही प्रेरणादायी कथा आता लवकरच प्रेक्षकांपर्यत पोहोचणार आहे."


पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' या बायोपिकचा ट्रेलर ओटीटी प्लॅटफॉर्म वर रीलीज झालेला आहे. विवेक ओबेरॉयने आपल्या अधिकृत इंस्टा अकाऊंटवर या सिनेमाच्या ट्रेलरचा व्हिडियो शेअर केला आहे. 'ओमंग कुमार'  दिग्दर्शित या चित्रपटात विवेक आनंद ओबेरॉय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटात मोदींच्या वास्तविक जीवनातील उपक्रमांच्या परिवर्तनाचे किस्से मांडले आहेत.


चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार म्हणाले, मला खूप आनंद होत आहे की एमएक्स प्लेयर ने या कथेला त्यांच्या प्लॅटफॉर्म रिलीज करण्याची संधी दिली. त्यामुळे ही प्रेरणादायी कथा अधिक घरातघरांत पोहचेल अशी मे आशा व्यक्त करतो.


विवेक ओबेरॉय सोबतच या चित्रपटात  मनोज जोशी, बरखा बिष्ट, जरीना वहाब आणि बोमन ईरानी आपल्याला दिसून येतील. या सोबतच इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत किशोरी पेडणकर दिसून येईल.


संबंधित बातम्या :