Bigg Boss OTT Finale : शमिता शेट्टी आणि निशांत भट यांना मागे टाकत दिव्या अगरवाल (Divya Agrawal) बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) या कार्यक्रमाची विनर बनली आहे. तिला 25 लाख रुपयांचा इनाम मिळाला आहे. या फिनालेमध्ये निशांत भट हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर शमिता शेट्टी ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे.
बिग बॉस ओटीटी हा शो पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आला होता. या शोचा होस्ट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर होता.
दिव्या अगरवालचा या शोमधील प्रवास हा खडतर ठरला होता. शमिता शेट्टीसोबत तिची सुरुवातीला चांगली बॉन्डिंग होती पण नंतर त्यामध्ये दुरावा येण्यास सुरुवात झाली. या दोघींमध्ये अनेक मुद्द्यावरुन भांडणं सुरु झाली. दिव्याचा बॉयफ्रेन्ड वरुण तिला ज्यावेळी भेटायला आला त्यावेळी ती इमोशनल झाल्याचं सर्वांनीच पाहिलं. वरुणला पाहताच दिव्या रडायला लागली.
बिग बॉस ओटीटी हा कार्यक्रम पहिल्यांदाच लॉन्च करण्यात आला. सहा आठवडे चाललेल्या या कार्यक्रमाची सुरुवात 8 ऑगस्टला झाली होती. दिव्या अगरवालने या आधीही अनेक रियालिटी शोमध्ये भाग घेतला आहे. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून तिचे फॅन फॉलोवर्सची संख्या मोठी आहे.
बिग बॉस 15 चा होस्ट सलमान खान
बिग बॉस 15 ची सुरुवात 2 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून या शोचा होस्ट अभिनेता सलमान खान असणार आहे. या शोचा प्रोमो रीलिज झाला आहे. या शोमध्ये अभिनेत्री रेखा ही स्पेशल अपियरंन्समध्ये असेल.
संबंधित बातम्या :