Ranveer Singh Kapil Dev Look Transformation : बॉलिवूड स्टार रणवीर सिंहने '83' सिनेमात कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. रणवीरने साकारलेल्या भूमिकेचे क्रिकेटप्रेमी आणि सिनेसृष्टीकडून कौतुक केले जात आहे. 
कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीर 6 महिने अभ्यास करत होता. रणवीरला चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाला भारतासह जगभरातून प्रचंड प्रेम मिळत आहे. 


रणवीरने 'बाजीराव', 'पद्मावत', 'सिम्बा' 'गली बॉय'पासून '83' सिनेमात महत्तवपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी रणवीर एक आहे. सिनेमाला मिळणाऱ्या यशाबद्दल रणवीर म्हणाला,"चाहत्यांचे मिळणारे प्रेम पाहूण मी भारावून गेलो आहे. क्रिडा विश्वातील दिग्गजांनीदेखील माझ्या कामाची प्रशंसा केली. जेव्हा असे महान व्यक्ती आपण केलेल्या कामाचे कौतुक करतात. तेव्हा आणखी काय हवं".


रणवीर पुढे म्हणाला,"मी कपिल सरांसोबत त्यांच्या घरी काही काळ घालवला आणि त्यांचा स्वभाव जाणून घेतला. त्यांचे हसणे, चालणे, बोलणे यासोबतच त्यांच्या मनात काय चालले असेल याचा मी विचार करायचो. 1983 मध्ये त्या वेळी ते काय विचार करत असतील हे जाणून घेतले".


 


रणवीर सिंहचा '83' सिनेमा 24 डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे कथानक 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खानने केले आहे.  या चित्रपटात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत. दीपिका या चित्रपटाची सहनिर्मातीदेखील आहे.


संबंधित बातम्या


Bollywood Movies : '83' पासून 'The Hand Of God' पर्यंत बिग बजेट सिनेमे येत्या काही दिवसांत करणार प्रेक्षकांचे मनोरंजन


सलमान खानला सर्पदंश! पनवेलमधील फार्महाऊसवरील घटना, संकट टळल्याची माहिती


क्रिकेटर रविंद्र जडेजाने शेअर केला पुष्पा द राइज सिनेमातील फेमस डायलॉगचा व्हिडीओ, चाहत्यांनी दिला 'हा' सल्ला