Pawankhind Movie : फर्जंद, फत्तेशिकस्तच्या यशस्वी घोडदौडनंतर दिग्पाल लांजेकर आता 'पावनखिंड' सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
"सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात त्या रात्री हर हर महादेव हा एकच गजर झाला. राकट मराठ्यांच्या स्वामिनिष्ठेपुढे गनिम हतबुद्ध झाला. आषाढ पौर्णिमेच्या रात्री घोडखिंडीत कोरलं गेलं बाजीप्रभू आणि बांदल सेनेच्या रक्तानं इतिहासाचं विजयी पराक्रमी पान...पावनखिंड त्याचं नाव!", असं म्हणत सिनेमाच्या टीमने पावनखिंड सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे.
पावनखिंडीचा रणसंग्राम घडून आज 361 वर्षांचा काळ उलटला असला तरी हा अतुलनीय लढा आणि बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे. 'पावनखिंड' सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरने केले आहे. झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा अभूतपूर्व अध्याय उलगडून दाखविणाऱ्या या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता होती.
प्रेक्षकांची उत्सुकता आता संपणार आहे. 31 डिसेंबरला स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा पावनखिंड सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. पावनखिंडीचा थरार दर्शवणारे सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'पावनखिंड' चित्रपटात अतिशय प्रभावीपणे मांडली आहे.
सिनेमात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आणि मावळ्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा पहायला मिळणार आहे. तसेच मराठी कलाकारांचा भलामोठा फौजफाटा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. घोडखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं 'पावनखिंड' नाव पडलं. प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा ऐतिहासिक सिनेमाचा अनुभव घेता येणार आहे.
संबंधित बातम्या
बॉलिवूड चित्रपटांची मक्तेदारी मोडत 'झिम्मा' आणि 'जयंती'ची यशस्वी भरारी
'आम्ही पुणेरी' नंतर आता ‘श्रेयश - द किंग जेडी’ च्या ‘मैदान मार’ गाण्याची चर्चा
26/11 Mumbai Attack: शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित 'मेजर' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha