Brahmastra : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ब्रह्मास्त्र (Brahmāstra) हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.या चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरसोबतच अभिनेता नागार्जुन (Nagarjuna), अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा निर्माता करण जोहरनं ब्रह्मास्त्र चित्रपटातील 'वानर अस्त्र' या अस्त्राचा एक व्हिडीओ  शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


'वानर अस्त्राची शक्ती 8 दिवसांनी तुम्हाला दिसेल.' असं कॅप्शन देऊन करणनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.   या व्हिडिओमध्ये वानर अस्त्र एका भिंतीकडे धावत येतो आणि फायरबॉलला लाथ मारतो. हा  फायरबॉलला दुसऱ्या बाजूला कोणावर तरी पडते. वानर अस्त्रा हा भूमिका अभिनेता शाहरुख खान साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. 


शाहरुखचे चाहते झाले एक्सायटेड
व्हिडिओमध्ये शाहरुख खानचा चेहरा दिसत नसला तरी त्याच्या शरीरावरून चाहत्यांना समजले आहे की तो शाहरुख आहे. नमिश चक्रवर्ती यांनी  करणनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट  केली, 'हा शाहरुख खान'  एका चाहत्याने लिहिले - 'हा खरोखर शाहरुख खानच आहे.'






मौनी रॉयनं दिली होती माहिती


शाहरुखच्या कॅमिओबद्दल ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या टीमकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नुकत्याच मौनी रॉयने एका मुलाखतीत शाहरुख खानच्या कॅमिओची माहिती दिली. मुलाखतीत ती म्हणाली ' या चित्रपटाचा भाग बनून मला खूप आनंद होत आहे. रणबीर, आलिया, बच्चन सर, नागार्जुन सर आणि शाहरुख सरांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली.'


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Brahmastra : जबरदस्त अॅक्शन अन् बिग बींचा खास लूक; ब्रह्मास्त्रचा नवा टीझर रिलीज