Sidharth Shukla : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं (Sidharth Shukla) वयाच्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आज सिद्धार्थचा पहिला स्मृतिदिन आहे. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सिद्धार्थनं मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच त्यानं बिग बॉस, खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर यांसारख्या स्पर्धांमध्ये देखील सहभाग घेऊन पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलं. सिद्धार्थचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. जाणून घेऊयात सिद्धार्थबद्दल...


12 डिसेंबर 1980 रोजी सिद्धार्थचा जन्म झाला. त्याचे वडील अशोक शुक्ला हे सिव्हिल इंजिनिअर होते आणि आई रीता शुक्ला या गृहिणी होत्या. सिद्धार्थच्या वडिलांचे करिअरच्या सुरुवातीलाच निधन झाले. सिद्धार्थला 2 बहिणी देखील आहेत. सिद्धार्थनं मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. सिद्धार्थनं काही वर्ष मॉडेलिंग क्षेत्रात देखील काम केलं. 


2008 मध्ये केलं अभिनय क्षेत्रात पदार्पण
'बाबुल का आंगन छूटे ना से' या 2008 मधील मालिकेमधून सिद्धार्थनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.  'ये अजनबी और लव यू जिंदगी', 'बालिका वधू', 'झलक दिखला जा', 'अजनबी', 'सीआईडी आणि  'पवित्र रिश्ता' यांसारख्या मालिकांमध्ये सिद्धार्थनं काम केलं. 'बिग बॉस 13'  या कार्यक्रमाचा सिद्धार्थ विजेता ठरला. या कार्यक्रमामधील सिद्धार्थ आणि शहनाज गिल यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सिद्धार्थ हा फिटनेसकडे विशेष लक्ष द्यायचा. त्याच्या फिटनेसनं अनेकांचे लक्ष वेधले होते. 


 चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये देखील केलं काम


सिद्धार्थनं मालिकांसोबतच चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये देखील काम केलं. 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटामध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेतून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.  तसेच 'ब्रोकन बट ब्यूटीफुल' या वेब सीरिजच्या तीन भागामध्ये त्यानं महत्त्वाची भूमिका साकारली. ही सिद्धार्थची पहिली वेब सिरीज होती.  सिद्धार्थच्या निधनामुळं टीव्ही इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आज सिद्धार्थच्या  स्मृतिदिनानिमित्ता त्याचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: