एक्स्प्लोर

Pathaan Box Office Collection: 500 कोटींच्या क्लबकडे पठाणची वाटचाल; 19 व्या दिवशी केली एवढी कमाई

शाहरुखच्या (Shah Rukh Khan) पठाणमधील (Pathaan) डायलॉग्सला आणि अॅक्शन सिन्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन 19 दिवस झाले आहेत.

Pathaan Box Office Collection : अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट पठाण (Pathaan) हा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट शाहरुखसाठी खास आहे कारण या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुखने रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. शाहरुखच्या या कमबॅकची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत होते. शाहरुखच्या पठाणमधील डायलॉग्सला आणि अॅक्शन सीन्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन 19 दिवस झाले आहेत. आता या चित्रपटाने रिलीजनंतर तिसऱ्या रविवारी म्हणजेच 12 फेब्रुवारी कोट्यवधींचे कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कमाईबद्दल....

पठाणचं 19 व्या दिवसाचं कलेक्शन  

पठाण हा चित्रपट रिलीज होऊन 19 दिवस झाले आहेत. तरी देखील पठाण फीवर कमी होत नाहीय. 19 व्या दिवशी म्हणजेच रविवारी (12 फेब्रुवारी) या चित्रपटाने 13 कोटींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट लवकरच 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर 489.05 कोटींची कमाई केली. 

पठाणची रेकॉर्ड ब्रेक कमाई

दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदच्या पठाण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, पठाण चित्रपटाने 300 कोटींच्या क्लबमध्ये सर्वात लवकर सामील होणारा चित्रपट ठरला. बाहुबली-2 हिंदी (10 दिवस), 'केजीएफ 2' हिंदी (11 दिवस), दंगल (13 दिवस), संजू (16 दिवस), टायगर जिंदा है (16 दिवस), पिके (17) वॉर (19), बजरंगी भाईजान (20 दिवस), सुल्तान (35 दिवस)  या चित्रपटांना मागे टाकत पठाण हा सर्वात कमी दिवसात 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा चित्रपट ठरला.

पठाण चित्रपटात शाहरुख खान रॉ एजंटच्या भूमिकेत

पठाण चित्रपटात शाहरुख आणि दीपिकासोबतच, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच, या चित्रपटात अभिनेता सलमान खानने देखील कॅमिओ केला आहे. शाहरुखने पठाण चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.  पठाण चित्रपटामधील गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटामधील झुमे जो पठाण आणि बेशरम रंग या दोन गाण्यांवरील रिल्स नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. बेशरम रंग या गाण्यातील दीपिका आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Pathaan : 'बेशरम रंग' ते बॉयकॉटच्या धमक्या! अ‍ॅक्शन आणि फाईट सीक्वेन्सची उत्कृष्ट बांधणी; जाणून घ्या शाहरुखच्या 'पठाण'च्या यशाचं रहस्य काय?

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
Embed widget