Parineeti Chopra Raghav Chadha : आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांचा काल साखरपुडा पार पडला. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत राघव आणि  परिणीती यांचा  साखरपुडा दिल्ली येथील कपूरथला हाऊसमध्ये पार पडला. राघव आणि परिणीती यांच्या साखरपुड्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हजेरी लावली होती. राघव आणि परिणी यांच्या साखरपुड्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सध्या राघव आणि परिणी यांच्या साखरपुड्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील राघव आणि परिणीती यांच्यामधील केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  


राघव आणि परिणीती यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये परिणीती राघवसोबत 'माही मैनू छड योना कि तेरे बिना दिल नहीं' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये राघव आणि परिणीती यांच्या रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


पाहा व्हिडीओ: 









Parineeti Raghav Engagement : खास थीम, प्रमुख पाहुणे, हटके लूक; परिणीती आणि राघवचा रॉयल साखरपुडा