Cannes Film Festival 2023 Details : जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ची गणना होते. भारताची मान उंचवण्यासाठी अनेक सेलिब्रिटी 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'च्या (Cannes Film Festival 2023) रेड कार्पेट उतरणार आहेत. तसेच अनेक सिनेमेदेखील या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. 


'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' कधी सुरू होणार? (Cannes Film Festival 2023 Date-Time Details)


76 व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 16 मे 2023 पासून यंदाचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' सुरू होणार आहे. 16 मे पासून सुरू होणारा हा फेस्टिव्हल 27 मे पर्यंत सुरू राहणार आहे. या फेस्टिव्हलला हॉलिवूड ते बॉलिवूडपर्यंत सिनेविश्वातील अनेक मंडळी उपस्थित राहणार आहेत. 


'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' कुठे होणार आहे? 


'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'चं आयोजन फ्रान्समधील फ्रेंच रिवेरा येथे होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक सिनेमे दाखवले जाणार आहेत. या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटी आपल्या अदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. 


'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'मध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी 


'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'मध्ये अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) हजेरी लावणार आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 च्या ज्युरीमध्ये फ्रेंच अभिनेता डेनिस मेनोशेट, अमेरिकन अभिनेत्री ब्री लार्सन, अमेरिकन अभिनेता-दिग्दर्शक पॉल डॅनो, ब्राझिलियन चित्रपट निर्माता रुंगानो न्योनी, अफगाण लेखक-दिग्दर्शक अतिक राहीमी, मोरोक्कन चित्रपट दिग्दर्शक मरियम तोझानी, चित्रपट दिग्दर्शक डॅमियन सिफ्रोन फ्रेंच दिग्दर्शिका ज्युलिया डुकोरानु यांचा समावेश आहे.


कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिकीटाची किंमत लाखो रुपये


सेलिब्रिटींशिवाय पत्रकार आणि चित्रपट समीक्षकही कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होऊ शकतात. मात्र, त्यासाठी त्यांना लाखो रुपये खर्च करुन तिकीट काढावे लागणार आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठीची तिकीटाची किंमत पाच लाख ते 20 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्याच्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन तिकीट बुक करता येते. 


'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'चा ड्रेस कोड काय आहे? 


'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'मध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी खास ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. तसेच या ड्रेस कोडचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे सांगण्यात आले आहे. महिला कॉकटेल ड्रेस परिधान करू शकतात. ब्लॅक टॉप, ब्लॅक ट्राउजर किंवा भडक रंगाची फॉर्मल ट्राउजर महिला परिधान करू शकतात. तर दुसरीकडे या परुषांना डिनर जॅकेट किंवा सूट परिधान करावे लागतील. तसेच या ड्रेसवर शूजदेखील घालावे लागणार आहेत. 


संबंधित बातम्या


Anushka Sharma Cannes 2023 Debut: ‘कान्स फिल्म फेस्टिवल’ला अनुष्का लावणार हजेरी? फ्रान्सच्या राजदूतांनी शेअर केलेल्या ट्वीटनं वेधलं लक्ष