Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) आज लग्नबंधनात अडकणार आहे. उदयपूरमधील (Udaipur) 'द लीला पॅलेस'मध्ये (The Leela Palace) त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नसोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींसह राजकीय मंडळीदेखील हजेरी लावणार आहेत. 


परिणीती-राघवच्या लग्नात दिग्गज पाहुण्यांची उपस्थिती


परिणीतीची खास मैत्रीण सानिया मिर्जा, हरभजन सिंह, करण जौहर, मनीष मल्होत्रा, आदित्य ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, राजस्थानचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्यात उपस्थित राहणार आहे. तसेच उद्योपती संजीव अरोडादेखील या लग्नसोहळ्याला हजेरी लावतील.


परिणीती आणि राघव यांचा शाही विवाहसोहळा असणार आहे. या लग्नसोहळ्यात परिणीती पेस्टल रंगाचा आऊटफिट परिधान करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सेलिब्रिटी फॅशन डिझायनकर मनीष मल्होत्राने परिणीतीचा आऊटफिट डिझाइन केला आहे. परिणीती-राघव पंजाबी रितीरिवाजांनुसार लग्नबंधनात अडकणार आहेत.


परिणीती-राघव यांच्या लग्नात पाहुण्यांच्या यादीपासून ते संपूर्ण तयारीसाठी 100 खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या लग्नसोहळ्यात नो फोन पॉलिसीचा अवलंब करण्यात आला आहे. या लग्नसोहळ्यात पाहुण्यांना पंजाबी तसेच राजस्थानी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.






नो फोन पॉलिसी (No Phone Policy)


परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्यात नो फोन पॉलिसी असणार आहे. दोघांनाही त्यांचं लग्न प्राइव्हेट ठेवायचं आहे त्यामुळे त्यांनी या पॉलिसीचा अवलंब केला आहे. परिणीती आणि राघव यांचे आज प्री-वेडिंग फंक्शन होणार आहेत. तर 24 सप्टेंबरला त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडेल.


चंदीगढमध्ये होणार रिसेप्शन


परिणीती आणि राघव यांचं आज (24 सप्टेंबर) लग्न झाल्यानंतर 30 सप्टेंबरला चंडीगढ येथे रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनलाही बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित असणार आहेत. आपचे (AAP) संजय सिंह यांनीदेखील परिणीती-राघव यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांचेही चाहते आता त्यांच्या लग्नसोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


संबंधित बातम्या


Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : पंचतारांकित हॉटेल, वेडिंग मेन्यू ते नो फोन पॉलिसी; परिणीती-राघव यांच्या शाही विवाहसोहळ्याबद्दल एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही...