Pankaj Udhas : पंकज उधास (Pankaj Udhas) यांना गजलचा बादशहा म्हटले जाते. 17 मे 1951 रोजी गुजरातमधील जेतपर येथे त्यांचा जन्म झाला. गजलला महत्त्व मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अनेक गजल चाहत्यांच्या हृदयाला स्पर्श करुन जातात. आज त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 


पंकज उधास यांनी आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्यांनी गायलेल्या 'नाम' या सिनेमातील 'चिट्टी आयी है' या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. गझल हृदयाला भिडवणारा जादुई आवाज आज शांत झाला आहे. त्यांच्या निधनाने देश एका मोठ्या गीतकाराला मुकला आहे.


कोण होते पंकज उधास? (Who is Pankaj Udhas)


पंकज उधास यांचा जन्म गुजरातमधील जेतपूरमध्ये झाला. केशुभाई उधास आणि जितुबेन उधास हे त्यांचे आई-वडील. त्यांनी सर बीपीटीआय भावनगरमध्ये शिक्षण घेतले होते. पुढे ते मुंबईला आले आणि मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयात त्यांचे पुढील शिक्षण झाले. 


पंकज उधास यांचा पहिला गझल अल्बम आहट  1980 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातून त्यांना यश मिळू लागले आणि 2011 पर्यंत त्यांनी 50 पेक्षा अधिक अल्बम आणि शेकडो संकलन अल्बम रिलीज केले. 1986 मध्ये 'उधास' यांना चित्रपटात काम करण्याची आणखी एक संधी मिळाली. 1990 मध्ये, घायाल चित्रपटासाठी त्यांनी लता मंगेशकर सोबत "माहिया तेरी कसम" हे मधुर युगल गीत गायले. या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. 1994 मध्ये, उधासने साधना सरगम ​​सोबत मोहरा चित्रपटातील "ना कजरे की धार" हे उल्लेखनीय गाणे गायले जे खूप लोकप्रिय झाले. साजन , ये दिल्लगी , नाम आणि फिर तेरी कहानी याद आयी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी पार्श्वगायक म्हणून काम करणे सुरूच ठेवले . डिसेंबर 1987 मध्ये म्युझिक इंडियाने लाँच केलेला त्यांचा शगुफ्ता अल्बम भारतात कॉम्पॅक्ट डिस्कवर रिलीज झालेला पहिला अल्बम होता. 


'अशी' मिळाली पंकज उधास यांना बॉलिवूडमध्ये संधी


पंकज उधास यांचे वडील शेती करत असे. त्यांचे मोठे भाऊ मनहार उधास आणि निर्मल उधास हे बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक आहेत. दोन भावांमुळेच पंकज उधास यांनी संगीताची गोडी निर्माण झाली आणि त्यांनी या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. शास्त्रीय संगीताचे त्यांनी धडे गिरवले आहेत. पंकज उधास यांना 1972 रोजी प्रदर्शित झालेल्या 'कामना' या सिनेमात पहिल्यांदा गाणं गाण्याची संधी मिळाली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला असला तरी त्यांनी गायलेल्या गाण्याचे मात्र कौतुक झाले. त्यानंतर पुढे त्यांनी गजल गाण्यास सुरुवात केली. 


'चिट्टी आयी है' गाण्याने बदललं आयुष्य


'नाम' हा सिनेमा 1986 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील 'चिट्टी आई है' हे गाणं चांगलच गाजलं. या गाण्याने त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. या गाण्याला आनंद बक्षी यांनी संगीत दिलं होतं. रसिकांना या गाण्याने वेड लावलं. आजही हे गाणं आवडीने ऐकलं जातं. या गाण्याने पंकज उधास यांचं आयुष्य बदललं.


संबंधित बातम्या


Pankaj Udhas Passed Away : गझल नि:शब्द झाली! ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन