Laapataa Ladies: किरण राव (Kiran Rao) लवकरच 'लापता लेडिज' (Laapataa Ladies) या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून समोर येणार आहे. आमिर खानही (Amir Khan) या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक आहे. नुकताच नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रदर्शित करण्याची तयारी सध्या सुरु आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये कास्टींग डायरेक्टर रोमिल यांना सहनिर्माते तानाजी दासगुप्ता यांनी मेसेज केला होता. एका चित्रपटासाठी किलिंग पिक्चर्सशी आपली बोलणी सुरू असून या चित्रपटात किरण रावसाठी कास्टिंग करावी लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याविषयी बोलताना रोमिल यांनी म्हटलं की, एका क्षणाला मला असं वाटलं की हा सिनेमा माझ्या हातून गेलाय कारण या सिनेमाचा मिटींगला मी माझ्या जोडीदारासोबत उशीरा पोहचलो. पण असं काहीही झालं नाही आणि मी या सिनेमात कास्टींग डायरेक्टर म्हणून सामील झालो.
मध्यप्रदेशसोबत आहे विशेष नात
लापता लेडिज या चित्रपटाचं मध्य प्रदेशशी विशेष नातं आहे. या चित्रपटांचे बहुतांश शुटींग हे सिहोर जिल्ह्यातील बामुलिया गावात झाले आहे. या चित्रपटात कलाकरांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार असल्याचं सिनेमाच्या ट्रेलरवरुन म्हटलं जात आहे. अलीकडेच, चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर रोमिल यांनी चित्रपटातील कलाकारांच्या कास्टिंगबद्दल काही रंजक किस्से सांगितले आहेत.
सिनेमाचे कास्टींग सुरु करताच लागलं लॉकडाऊन
एका मुलाखतीदरम्यान रोमिल यांनी सांगितलं की, या चित्रपटाचे कास्टिंग सुरु होताच, कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं. त्यावेळी आम्ही आऊटसोर्सिंग सुरु केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यासाठी आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचीही मदत घेतली होती. किरण रावला या चित्रपटसाठी पोस्टर गर्ल्स आणि चांगले अभिनय करणारे कलाकार हवे होते, असंही रोमिल यांनी यावेळी सांगितलं.
जवळपास 1000 ऑडीशन्सनंतर मिळाली 'लापता लेडीज'
या चित्रपटातील लापता लेडीजसाठी आम्ही दिल्ली, बिहार, एमपी-यूपी, बंगळुरू, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड या राज्यांमध्ये फिरलो. या राज्यांमध्ये आम्ही जवळपास 1000 पेक्षा अधिक ऑडीशन्स घेतले. तेव्हा जाऊन आम्हाला लापता लेडिज भेटली. त्यानंतर आमचा आमच्या पोस्टर गर्लचा शोध सुरु केला. सुमारे आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये या चित्रपटाचे कास्टींग पूर्ण झाले. या प्रक्रियेदरम्यान, असोसिएट कॉस्टिंग डायरेक्टर राम रावत माझ्यासोबत होते, असं रोमिल यांनी म्हटलं.