Pankaj Udhas : ज्येष्ठ गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दीर्घ आजाराने त्यांनी प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ गजलगायक भीमराव पांचाळे (Bhimrao Panchale) शोक व्यक्त करत म्हणाले,"पंकज उधास यांचं जाणं हे गझलचं मोठं नुकसान आहे. अन्य गायकांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे, त्यात असे मोहरे जाणं हे धक्कादायक आहे". 


ज्येष्ठ गजलगायक भीमराव पांचाळे  (Bhimrao Panchale) म्हणाले,"पंकज उधास यांचं जाणं हे गझलचं मोठं नुकसान आहे. आमच्या कमी भेटी झाल्या, पण त्या लक्षात राहणाऱ्या होत्या. खूप मोठा माणूस होता. अतिशय साधा आणि संवादी पद्धतीने गझल सादर करत होते. त्यांच्या गायकिची वेगळी पद्धत निर्माण झाली होती, ती अतिशय लोकप्रिय होती. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली". 


भीमराव पांचाळे पुढे म्हणाले,"गझल गायक क्षेत्रात खूप संख्या कमी आहे. अन्य गायकांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे, त्यात असे मोहरे जाणं हे धक्कादायक आहे. आमच्या गझल क्षेत्राचं मोठं नुकसान आहे".


सुरेश वाडकर भावूक


ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) म्हणाले,"पंकज उधास यांनी आपल्या गझलने समस्त दुनियेला आनंद दिला. ते आपल्यातून गेले, ही धक्कादायक बातमी आहे. पंकज उधास यांचं जाणं फारच वाईट झालं. त्यांच्या कुटुंबाबत विचार करुन माझ्या अंगावर काटा येतोय. त्यांची पत्नी, कन्या खूपच प्रेमळ मुलगी. पंकज उधास यांच्या 'खजाना' या अल्बमचं पुन्हा येणार होते. माझ्या शाळेत त्याच्या रिहर्सल्स सुरु होत्या. पंकज उधास उच्चशिक्षित होता, इतका मोठा गाणारा माणूस, चांगला मित्र आज आम्ही गमावला. त्यांच्या कुटुंबीयांना इतका मोठा धक्का पचवण्याची शक्ती इश्वर देवो, ही प्रार्थना".


पंकज उधास यांनी आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्यांनी गायलेल्या 'नाम' या सिनेमातील 'चिठ्ठी आई है' या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. पंकज उधास (Pankaj Udhas) यांना गजलचा बादशहा म्हटले जाते. 17 मे 1951 रोजी गुजरातमधील जेतपर येथे त्यांचा जन्म झाला. गजलला महत्त्व मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अनेक गजल चाहत्यांच्या हृदयाला स्पर्श करुन जातात. आज त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पंकज उधास यांनी गायलेल्या गाण्यांची आणि गझलांची आजही संगीतप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ आहे. 



संबंधित बातम्या


Pankaj Udhas Passed Away : गझल नि:शब्द झाली! ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन